आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विहामांडवा, हिरडपुरी शिवारामध्ये तारेच्या घर्षणाने 20 एकर ऊस खाक; दोनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या मदतीने आग आटोक्यात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विहामांडवा- पैठण तालुक्यातील विहामांडवा व हिरडपुरी शिवारात ४ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेदरम्यान मुख्य विद्युत वाहिनीच्या तारेच्या घर्षणाने दोन घटनेत सुमारे वीस एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले. यात संबंधितांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने व तहसील प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

 

विहामांडवा, हिरडपुरी मुख्य वहिनीला तारांचे घर्षण होऊन हिरडपुरी शिवारातील गट नंबर ७२ मध्ये हरिंदर वीर, दादासाहेब वीर, राजेंद्र वीर, दशरथ वीर यांचा सुमारे बारा एकर ऊस जळून खाक झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुमारे दोनशेहून अधिक शेतकरी मजूर मदतीला धावले. त्यामुळे आग आटोक्यात आली. शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे इतर ऊस बचावला. दुसऱ्या घटनेत विहामांडवा, नवगाव या मुख्य वाहिनीला तारेचे घर्षण होऊन बाळासाहेब पन्हाळकर यांच्या मालकीच्या गट क्रमांक ४४१ मधील ४ एकर ऊस जळून खाक झाला.