आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सयाजी शिंदेंनी विझवली झाडांना लागलेली आग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - कात्रज नवीन बोगद्याजवळ असलेल्या डोंगरालगत झाडांना लागलेली आग प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी मित्रांसोबत विझवली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.कात्रज नवीन बोगद्यालगत दोन्ही बाजूंनी डोंगराचा परिसर असून, त्याठिकाणी झाडे आहेत. रविवारी अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांचे मित्र पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कात्रज बोगद्याजवळ टेकडीवरील झाडांना आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अभिनेते शिंदे यांनी तत्काळ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर आग विझवण्यात त्यांना यश आले. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना नव्हती. त्यानंतर सयाजी शिंदे यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. यासंदर्भात अग्निशमन दलाला याबाबत विचारले असता त्यांनी या संदर्भात कुठलीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अभिनेते सयाजी शिंदे आणि त्यांच्या मित्रांचे नागरिकांनी कौतुक केले आहे. सयाजी शिंदे हे राज्यात नेहमी वृक्षारोपणाचे विविध कार्यक्रम राबवत असतात. तसेच, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीचा संदेशही ते वेळोवेळी देत असतात. नेहमी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेणाऱ्या सयाजी शिंदे यांना जळणारी झाडे विझविताना बघून त्यांच्या संवेदनशीलपणाचे पुन्हा एकदा दर्शन घडून ‌आले. तसेच, होळीच्या दिवशी झाडांचे कुठलेही नुकसान होणार नाही याबाबत काळजी बाळगण्याचे आवाहन शिंदेनी केले.बातम्या आणखी आहेत...