आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी भागात 21 मजली इमारतीत आग, दोघे ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -  मुंबईतील अंधेरी भागात मंगळवारी रात्री एका २१ मजली इमारतीत आग लागून दोघांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ९.१०च्या सुमारास वीरा देसाई मार्गावर कदम नगरमधील एसएसए बिल्डिंगच्या १०व्या आणि ११ व्या मजल्यावर आग लागली. ही माहिती मिळताच दोन अग्निशामक बंब, पाण्याचे सहा टँकर्स घटनास्थळी दाखल झाले.

 

रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, दोन रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. मदतकार्यात उतरलेल्या लोकांनी दोघांना आगीतून बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. अन्य तिघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते.

बातम्या आणखी आहेत...