आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळमध्ये केळीची बाग जळून खाक, एक एकरातील ठिबकचे 3 लाखाचे नुकसान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ- खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे केळीच्या बागेस आग लागून एक एकर बागेचे व पावने दोन एकर ठिबक संचाचे असे एकूण तीन लाखाचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.

 

वेरूळ येथील माटेगाव रोडवर फिरोज हुसैन कुरेशी यांची गट नं 246 मध्ये सहा एकर शेती आहे. यामध्ये त्यांचा पावने दोन एकर केळीचा बाग असून या बागेमधून महावितरणच्या तारा गेल्या आहे. तारांमध्ये शुक्रवारी रात्री सातनंतर स्पार्किंग होऊन ठिणग्या केळीच्या बागेत पडल्या. वाळलेल्या पानांमुळे आग संपूर्ण शेतात पसरली. आगीचे रौद्र रूप पाहाता शेजारील शेतकर्‍याने शेती मालक फिरोज यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने शेतात धाव घेत इतर शेतकऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविले. परंतु तोपर्यंत पावणे दोन एकर पैकी एक एकर केळीच्या मालासह ठिबक सिंचनाचे साहित्य जळून खाक झाले. शेतकर्‍याचे एकूण तीन लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...