Home | International | Other Country | Fire in National Museum of Brazil

ब्राझीलचे राष्ट्रीय संग्रहालय खाक; २०० वर्षे जुन्या संग्रहालयात होत्या २ कोटींपेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू

दिव्य मराठी | Update - Sep 04, 2018, 09:17 AM IST

ब्राझीलचे २०० वर्षे जुने राष्ट्रीय संग्रहालय जळून खाक झाले. ते नैसर्गिक इतिहासाचे लॅटिन अमेरिकेचे सर्वात मोठे संग्रहालय

 • Fire in National Museum of Brazil
  २०० वर्षे जुन्या संग्रहालयात २ कोटींपेक्षा जास्त ऐतिहासिक वस्तू होत्या

  रिओ दि जानेरिओ - ब्राझीलचे २०० वर्षे जुने राष्ट्रीय संग्रहालय जळून खाक झाले. ते नैसर्गिक इतिहासाचे लॅटिन अमेरिकेचे सर्वात मोठे संग्रहालय आहे. त्यात मानवशास्त्र, जिऑलॉजी आणि इतर विषयांशी संबंधित २ कोटींपेक्षा जास्त अमूल्य वस्तूंचा संग्रह होता. ममी, उल्कापिंड, जीवाश्मही होते. या घटनेवर राष्ट्रपती मायकेल टेमर म्हणाले की, ‘ब्राझीलसाठी हा दु:खद दिन आहे. दोनशे वर्षांचे काम, शोध आणि ज्ञान नष्ट झाले. आमच्या इतिहासाचे मूल्य इमारतीला झालेल्या नुकसानीवरून मोजता येत नाही.’ संग्रहालयाच्या संचालकांनी ही सांस्कृतिक हानी असल्याचे सांगितले. मात्र, आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागला नाही. आगीत जीवितहानीचेही वृत्त नाही. अग्निशमन दल ऐतिहासिक महत्त्वाच्या वस्तू वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.


  ६ जूनला म्युझियमला झाली होती २०० वर्षे
  > हे म्युझियम ६ जून १८१८ रोजी स्थापन झाले होते. पोर्तुगालचा शासक जॉनने राजमहालाला शाही संग्रहालय घोषित केले होते.
  > तेथे ब्राझीलचे सर्वात जुने विज्ञान पुस्तकालयही आहे. त्यात ४.७ लाख पुस्तके आणि २४०० दुर्मिळ कागदपत्रे ठेवली होती.
  > येथे ब्राझीलमध्ये मिळालेले सर्वात जुने जीवाश्मही आहेत. डायनासोरची हाडेही तेथे ठेवली होती. दरवर्षी तेथे दोन लाख लोक येत होते.


  पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संग्रहालयाची ओळख असलेल्या ३ दुर्मिळ वस्तू

 • Fire in National Museum of Brazil
  ६ जूनला म्युझियमला झाली होती २०० वर्षे
 • Fire in National Museum of Brazil

  ५.६ टन वजनी उल्कापिंड  
  या संग्रहालयात १७८४ मध्ये मिळालेला सर्वात मोठे उल्कापिंड होता. त्याचे वजन ५.३६ टन आहे.  

   

 • Fire in National Museum of Brazil

  १२ हजार वर्षे जुनी कवटी  
  ही महिलेची १२,००० वर्षे जुनी कवटी आहे. ती लॅटिन अमेरिकेत आढळलेली सर्वात जुनी कवटी आहे.  

   

 • Fire in National Museum of Brazil

  इस पूर्व ७५० ची ममी  
  येथे कोलंबियन युगाआधीची ममीही होती. इस ७५० पूर्वीच्या या ममीला एंडीन स्केलेटन म्हटले जात होते.  

   

Trending