Home | International | Other Country | Fire in Notre dam in Paris

पॅरिस कॅथेड्रलला आग : येशूचा काटेरी मुकुट वाचवण्यासाठी ज्वाळांनी लपेटलेले फादर फोर्नियर चर्चमध्ये पोहोचले ...

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 09:52 AM IST

जवळपास १५ तास हा कॅथेड्रल जळत होता.

  • Fire in Notre dam in Paris

    पॅरिस- सोमवारी नॉट्रे डाम कॅथेड्रलमध्ये अग्नितांडव सुरू होते. लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम सुरू होते. तेव्हा आपल्या प्राणाची पर्वा न करता फादर जीन मार्क फोर्नियर यांनी भगवान येशूचा (क्राऊन ऑफ थ्रोन्स) काटेरी मुकुट सुखरूप बाहेर आणला. हा मुकुट जगातील सर्वात अनमोल मानला जातो. फादर फोर्नियर मुकुटासोबत शुद्धीकरणाची सामग्रीदेखील वाचवू शकले. त्या वेळी त्यांना अग्निज्वाळांनी लपेटले होते. कॅथेड्रलमधील मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी ते मुळीच घाबरले नाही. यापूर्वी फादर फोर्नियर नोव्हेंबर २०१५ मध्ये चर्चमध्ये आले होते. आगीला आटोक्यात आणण्यासाठी ५०० अग्निशमन दलाचे कर्मचारी सक्रिय होते. जवळपास १५ तास हा कॅथेड्रल जळत होता.

    १५०० कोटींची देणगी दिली
    फ्रान्सचे उद्योजक अरनॉल्ट एलव्हीएमएचने १५०० कोटी रुपये तर हॉलीवूड कलाकार सलमा हायेकचे पती फ्रान्सिस पिनॉल्ट यांनी ७८६ कोटी रुपये देणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रपती मॅक्रोन यांनी कॅथेड्रॉल सगळे मिळून उभारू, असे स्पष्ट केले.

Trending