आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात २२ मजली इमारतीस आग, जीव वाचवणाऱ्या ७ जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढाका - बांगलादेशात ४० दिवसांत आगीची तिसरी मोठी घटना घडली. राजधानी ढाक्यात गुरुवारी २२ मजली इमारतीला आग लागली. त्यात ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेत ६८ जण जखमी झाले. मृतांमध्ये श्रीलंकेतील नागरिकांचाही समावेश आहे. सुमारे ३५ लोकांना वाचवण्यात यश मिळाले. इमारतीत अजूनही अनेक लोक अडकले आहेत, परंतु त्यांची नेमकी संख्या स्पष्ट करण्यात आली नाही. अग्निशमन दलाच्या २१ गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थ केली होती. हवाई दलाचे दाेन हेलिकॉप्टर, नौदलाची तीन दले मदतकार्यात व्यग्र आहेत. आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरमधूनही पाण्याचा शिडकावा करण्यात आला. आग दुपारी १ च्या सुमारास एफआर टॉवरच्या आठव्या मजल्यास लागली. हळूहळू ती इतर मजल्यांवर पसरली. आधी लोक जीव वाचवण्यासाठी आकांत करत होते. मदत पोहोचेपर्यंत अनेकांनी इमारतीवरून उड्या घेतल्या. त्यात सात जणांचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी सैन्याच्या कुरमिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीचे कारण समजू शकले नाही. इमारतीत कपड्यांचे दुकान व इंटरनेट सेवेचे कार्यालयदेखील आहे.

 

गत महिन्यात केमिकल गोदाम व झोपड्यांना आग, १२० मृत्यू
ढाक्यातील चौक बाजारातील केमिकल गोदामात ३५ दिवसांपूर्वी लागलेल्या आगीत ११० जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सुमारे ५० जण जखमी झाले होते. {बांगलादेशात सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे झोपड्या व गल्लीबोळातील इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. 

 

> जागतिक बँकेच्या मते राजधानी ढाक्याची लोकसंख्या सुमारे १.८ कोटी आहे. त्यापैकी ३५ लाख लोक झोपड्यांमध्ये राहतात. {बांगलादेशात सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे झोपड्या व गल्लीबोळातील इमारतींना आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. 

> जागतिक बँकेच्या मते राजधानी ढाक्याची लोकसंख्या सुमारे १.८ कोटी आहे. त्यापैकी ३५ लाख लोक झोपड्यांमध्ये राहतात. १७ फेब्रुवारी रोजी चटगावातील झोपडपट्टीही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. त्यात १० जणांचा मृत्यू झाला होता तर ५० जण जखमी झाले होते. गेल्या वर्षी बांगलादेशात अन्य एका आगीच्या घटनेत २२० जणांचा मृत्यू झाला होता.

 

 

बातम्या आणखी आहेत...