आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील अमृत योजनेच्या पाइपांना आग; तीन लाख रुपयांचे नुकसान ...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- अमृत योजनेंतर्गत शहरात पाइप लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी संपूर्ण शहरात पाइप ठेवण्यात आले आहेत. यातील विधी महाविद्यालयाच्या मैदानावर ठेवलेल्या पाइपांना सोमवारी दुपारी ४ वाजता अचानक आग लागली. यात सुमारे ३ लाख रुपयांचे पाइप जळून खाक झाले आहे. तर पोलिस कर्मचारी व तरुणांच्या मदतीने निम्मे पाइप आगीतून बाहेर काढण्यात आले. 


अमृत योजनेसाठी हे पाइप विधी महाविद्यालयाच्या मैदानावर ठेवलेे होते. एचजीपी (हाय डेन्सीटी पॉनीथीन) प्रकारचे हे पाइप आहेत. या मैदानावर एकूण ३० बंडल ठेवले होते. एका बंडलमध्ये ७५ मीटर लांबीचे पाइप गुंडाळलेे होते. सोमवारी दुपारी ४ वाजता पाइपांना अचानक आग लाली. शेजारी खेळत असलेल्या तरुणांना आग दिसताच त्यांनी त्या बाजूने धाव घेतली. काही नागरीक फोटो काढण्यात मग्न होते. यानंतर जिल्हापेठ पोलिसांना माहिती कळवण्यात आली. पोलिस ठाण्याचे नाना तायडे, रामेश्वर साठे, प्रशांत कंखरे व प्रशांत जाधव या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येताच काही पाइपांचे बंडल बाजूला काढण्याचे काम सुरू केले. हे पाहून राहुल पाटील (पेहलवान), मिहिर मालू, सुदर्शन सोमाणी, बबलू अनुसे यांनी देखील धाव घेत पाइप बाहेर काढण्यास सुरुवात केली. अग्निशामक दलाचे बंब पोहोचण्याच्या आत या तरुणांनी सुमारे १५ बंडल सुरक्षीतरित्या बाहेर काढले होते. तर उर्वरीत १५ बंडल आगीत खाक झाले. या आगीमुळे धुराळे प्रचंड लोळ आकाशात पसरले होते. अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी आग आटोक्यात आणली. 

 


जैन इरिगेशन कंपनीने अमृत योजनेच्या कामाचा ठेका घेतला आहे. घटनेची माहिती कळताच प्रकल्प व्यवस्थापक आर.बी.पाटील, अभियंता नारायण ललवाणी, दीपक जामोदकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी करून नुकसानीचा अंदाज व्यक्त केला. उर्वरित पाइपांना सुरक्षितस्थळी हलवले. 
 

बातम्या आणखी आहेत...