आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fire On Varun Dhawan's Movie 'Kuli No 1' Set, 15 People Were Present At That Time

वरुण धवनचा चित्रपट 'कुली नंबर 1' च्या सेटवर लागली आग, 15 लोक घटनास्थळी होते उपस्थित 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गोरेगांवमध्ये असलेल्या फिल्मिस्तान स्टूडियोमध्ये रात्री उशिरा आग लागली होती. आग स्टूडियो नंबर तीनमध्ये लागली ज्यामध्ये वरुण धवनचा चित्रपट 'कुली नंबर 1' चा सेट लागलेला होता. आग लागल्याचे कारण शॉर्ट सर्किट सांगितले जात आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाल्याची बातमी मिळालेली नाही. पण सेटचे खूप नुकसान झाले आहे. 
 
 
ही आग बुधवारी रात्री 12.30 वाजेच्या आसपास लागली आहे. घटनेच्यावेळी तिथे 15 वर्कर्स होते. त्यांनी लगेच फायर स्टेशनला कॉल केला आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली.  
 
 
माहितीनुसार, जोपर्यंत फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या तोवर आगीवर नियंत्रण मिळवले गेले होते. हा चित्रपट 1995 मध्ये आलेला गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा 'कुली नंबर 1' चित्रपटाचा रीमेक आहे. डेविड धवन आपला मुलगा वरुणसोबत या चित्रपटाचा रिमेक बनावट आहेत. 

बातम्या आणखी आहेत...