आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदिवलीच्या कापड गाेदामाला अाग लागून चार मजुरांचा मृत्यू, आगीचे कारण स्पष्ट नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कांदिवली पूर्व भागात असलेल्या दामूनगरमधील कपड्याच्या गाेदामाला लागलेल्या भीषण अागीत चार मजूर ठार झाले अाहेत. रविवारी दुपारी लागलेली ही अाग रात्री उशिरापर्यंत नियंत्रणात अाणण्याचे काम सुरू हाेते. साेमवारी सकाळी अग्निशमन दलाने घटनास्थळी घेतलेल्या शाेधमाेहिमेत ढिगाऱ्याखाली ४ जण दबलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चारही मृत या गाेदामात काम करणारे मजूर असल्याचे सांगितले जात आहे. राजू विश्वकर्मा (३०), राजेश विश्वकर्मा (३६), भावेश पारेख (५१) आणि सुदामा लालासिंग (३६) अशी मृतांची नावे आहेत. अागीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून अग्निशमन दल अाणि पाेलिसांकडून चाैकशी सुरू असल्याचे मुंबर्इ महानगरपालिकेच्या अापत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले. दामूनगरच्या गाेदामात रविवारी अागीचा भडका उडाल्यानंतर घाबरलेले मजूर बाहेर पडले. मात्र, अागीमुळे या ठिकाणची भिंत पडून काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात हाेती. त्यानुसार साेमवारी सकाळी अग्निशमन दलाने शोधमोहीम हाती घेतली असता त्यांना चार जण ढिगाऱ्यात दबलेले आढळून आले. या चाैघांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात अाले, परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. 

 

मालवणीत प्लास्टिक फॅक्टरीला अाग 
मुंबई अाग लागण्याचे सत्र साेमवारीही कायम राहिले. रविवारी मुंबईत अन्य तीन ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मालाड मालवणी येथील प्लास्टिकच्या फॅक्टरीत दुपारी बारा वाजता अाग लागली. प्लास्टिकचा भडका उडाल्याने अाग पसरली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अागीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे सुदैवाने अागीत काेणीही जखमी झाले नाही. परंतु फॅक्टरीचे माेठ्या प्रमाणावर अार्थिक नुकसान झाले. दरम्यान, याआधीही मुंबईतअ नेक ठिाकणी आगी लागल्या आहेत.

 

गोदामात आग प्रतिबंधक यंत्रणाच नसल्याचे उघड 

दामूनगर येथील संबंधित कपड्याच्या गोदामात आग प्रतिबंधक यंत्रणाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळेच आग भडकत गेल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच कुर्ला साकीनाका येथील भानू फरसाणमध्ये लागलेल्या आगीत १२ कामगार ठार झाले होते. यानंतर अग्निशमन दलाकडून मुंबईतील गोदामांचे सर्वेक्षण करून कारवाई सुरू करण्यात अाली. मात्र गोदामांना आग लागून कामगारांचे जीव जाण्याचा प्रकार सुरूच असल्याने गोदामांमधील आग प्रतिबंधक यंत्रणेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...