Home | National | Delhi | Fired in Delhi Hotel; 17 dead, 11 seriously injured

दिल्लीत अर्पित हॉटेलला पहाटे आग, 17 मृत्युमुखी, 11 गंभीर; काही जणांनी चौथ्या मजल्यावरून घेतली खाली उडी  

वृत्तसंस्था | Update - Feb 13, 2019, 07:48 AM IST

एकाच कुटुंबाने बुक केल्या होत्या १५ खोल्या 

 • Fired in Delhi Hotel; 17 dead, 11 seriously injured

  नवी दिल्ली- करोलबाग येथील हॉटेल अर्पित पॅलेसमध्ये मंगळवारी पहाटे साडेचार वाजता आग लागली. या आगीत १७ लोकांचा मृत्यू झाला आहे. २५ जणांना सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार बहुतांश लोकांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला. आग लागली तेव्हा ४५ खोल्यांमध्ये ५३ व्यक्ती होते. दरम्यान, या प्रकाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिल्ली सरकारकडून देण्यात आले आहे.


  आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी काही जणांनी हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये एकाच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत. आग लागल्याचे कारण अजून समजू शकले नाही.

  मंगळवारी पहाटे ४.३५ वाजता अर्पित पॅलेसमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी त्वरित अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अनेकांनी खिडकीतून उड्या घेतल्या. दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जखमींना राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये एक मुलगा आणि तीन महिलांचा समावेश आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये लावण्यात आलेल्या लाकडांच्या पॅनलमुळे आग जास्त पसरत गेली. लोकसभेत काँग्रेस नेते के.व्ही.थॉमस यांनी अर्पित पॅलेसमध्ये झालेल्या आगीची चौकशी करण्याची मागणी केली. लोकसभेत शून्य काळात प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, घटनेची चौकशी करून मृतांचा नातेवाइकांना भरीव मदत देण्याची मागणी केली.

  एकाच कुटुंबाने बुक केल्या होत्या १५ खोल्या
  एका कुटुंबाने १५ खोल्यांची बुकिंग केली होती. शहरातील एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे सर्व जण आले होते. यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मृताचे नातेवाईक राजशेखर नायर यांनी दिली. पी.नलिनी अम्मा, विद्यासागर, जयश्री असे तिघांची नावे आहेत.

Trending