आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पारधी समाजाच्या दोन गटांतील भांडणात गावठी कट्ट्याने तिघांवर गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब - पारधी समाजाच्या दोन गटांत झालेल्या भांडणात गावठी कट्ट्याने तिघांवर गोळीबार करण्यात आला.या तिघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कळंब शहरातील शिवाजी चौक ते साठे चौक परिसरात अनेक पारधी राहतात. मागील काही दिवसांपासून पारधी समाजाच्या दोन गटांत जुन्या भांडणावरून वाद चालू होता. दिनांक ६ जुलै रोजी दिवसभर या दोन गटांत वाद सुरू झाला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या मध्ये एका गटाने दुसऱ्या गटावर गावठी कट्टयाने गोळीबार केला आहे. या मध्ये विकास बापू पवार (२०), राहुल बापू पवार (२०) व बापू विष्णू धोत्रे या तीन जणांना गोळी लागली आहे. या मध्ये काही युवकांनी तलवार हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. हे पाहून शिवाजी चौकातील नागरिकांची धावपळ उडाली होती. या तिघांना कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे गंभीर जखमी असल्यामुळे त्या तिघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही वार्ता शहरात पसरताच शिवाजी चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. या मुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची माहिती पोलिसांना समजताच तत्काळ पोलिसांनी शिवाजी चौकात बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच दोन्ही गटांतील व्यक्तींचा कसूून शोध चालू आहे. उशिरापर्यंत कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला नव्हता.