आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Fired Upon Congress Candidate For Odisha Aska Assembly Seat, Manoj Jena, In Berhampur

ओडिशा विधानसभा/ मतमोजणीच्या आधीच काँग्रेसच्या उमेदवारावर गोळीबार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर- निवडणुकीच्या निकालापूर्वीच ओडिशामध्ये काँग्रेस नेत्यावर हल्ला करण्यात आला आहे. ओडिशाच्या अस्का विधानसभा सीटवरून काँग्रेसचे उमेदवार मनोज जेना यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी अंधाधुद गोळीबार केला. बुधवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रूग्णालयात दाखल केले.


पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार मनोज जेना यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. जेना हे आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून जात असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अंधाधुद गोळीबार केला. 


पोलिसांनी सांगितले की, जुन्हा वादातून त्यांच्यावर हा हल्ला झाला असावा. सध्या पोलिस हल्लेखोरांचा तपास करत आहेत. यासाठी पोलिसांनी दोन टीम बनवल्या आहेत. आरोपींना पकडल्यानंतरच हल्ल्यामागचे खरे कारण समोर येईल.


ओडिशात लोकसभेच्या निवडणुकीसोबतच विधानसभेचीही निवडणूक झाली आहे. अस्का मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार मनोज जेना यांचा सामना भाजपचे देवराज मोहंती आणि बीजेडीच्या मंजुला स्वाइन यांच्यासोबत होता.