आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉस अँजेलस - अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या जंगलात गेल्या दोन दिवसांपासून भडकलेल्या आगीने शनिवारी रौद्ररुप धारण केले. यामुळे तब्बल एक लाख लोकांना आपले घर सोडावे लागले. ही आग दर तासाला 800 एकरचा परिसर आपल्या कचाट्यात घेत आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या मते, आतापर्यंत सॅन फर्नांडो व्हॅलीमध्ये 7542 एकरचा भाग भस्मसात झाला आहे. आता आग लॉस अँजेलस शहरापासून फक्त 32 किमी दूर आहे. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे. मात्र शुक्रवारी संध्याकाळपर्यंत संपूर्ण भागातील फक्त 13% टक्के आगीवर नियंत्रण मिळवता आले.
आगीमुळे 22 हजार घरे उद्ध्वस्त होण्याचा धोका
जोरदार वाऱ्यामुळे या आगीला कॅलिफोर्नियाची मोठी आपत्ती घोषित करण्यात आले आहे. या आगीला सॅडलरिज फायर नाव देण्यात आले आहे. या आगीमुळे आतापर्यंत 31 इमारतींना नुकसान पोहोचले आहे. तर 20 हजार घरे या आगीच्या तावडीत सापडण्याची शक्यता आहे. सिलमर शहरापासून आगीची सुरुवात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या आग वाढण्याचे कोणतेही कारण समजू शकले नाही. परंतू जोरदार वारे आणि आर्द्रतेमुळे आग वेगाने पसरली आहे.
आग विझवण्यासाठी 1000 अग्निशमन दल व्यस्त होते
लॉस अँजेलस अग्निशमन विभागाचे प्रमुख राफ तेराजस यांनी लोकांना घर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. आग विझवण्यासाठी तब्बल एक हजार अग्निशमन दलाचे जवान काम करत आहेत. याशिवाय हेलिकॉप्टर आणि विमानांद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहे. या आगीमुळे बहुतांश भागात शाळा व महाविद्यालये बंद करण्यात आले आहेत. याशिवाय काही महामार्ग आणि मेट्रो सेवाही बंद करण्यात आल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.