आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Firing At Shahib Bag Area, Delhi; Police Arrested The Accused

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामियानंतर दिल्लीतील शाहीन बाग परिसरात गोळीबार, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस बॅरीकेडजवळ फायरिंक करणारा आरोपी अटक

नवी दिल्ली- दिल्लीतील जामिया परिसरात झालेल्या फायरिंगच्या दोन दिवसानंतर आज शाहीन बागमध्येही गोळीबार झाला. शाहीन बागमध्ये पोलिस बॅरिकेडजवळ केलेल्या फायरिंगनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. 


शाहीन बागमध्ये दुपारी दिड वाजेच्या सुमारास नागरित्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू होते. यावेळी आरोपी कपिल गुर्जरने पोलिस बॅरीकेडजवळ गोळीबार केला. पोलिस त्याला शाहीन बाग पोलिस स्टेशनमध्ये घेऊन गेले आहेत. सध्या कपिल गुर्जरची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचे डीसीपी चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की, आरोपी हवेत गोळीबार करू लागला, यावेळ त्याला ताब्यात घेण्यात आले.

शाहीन बागमधील आंदोलकांसोबत चर्चा करण्यास तयार- रविशंकर प्रसाद


केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज(शनिवार) शाहीन बागमध्ये सीएएविरोधात प्रदर्शन करत असलेल्या लोकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी ट्वीट केले की, ठरलेल्या रूपरेषेनुसार शाहीन बागमधील आंदोलकांसोबत ते चर्चा करतील. यादरम्यान त्यांच्या मनातील सीएएसंबंधी शंकादेखील दूर केल्या जातील. शाहीन बागमध्ये नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए)विरोधात 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. शाहीन बाग आणि जामिया यूनिव्हर्सिटीपासून सुरू झालेला विरोध दिल्लीतील 20 ठिकाणी होत आहे.