आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात 'तमंचे पे डिस्को' गाणे न वाजल्यामुळे लोकांना आला राग, केला अंधाधुंध गोळीबार: लग्नमंडपात उडाली एकच खळबळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचकूला - येथे मनसा देवी कॉम्प्लेक्स सेक्टर 1 मध्ये रविवारी रात्री लग्नसोहळ्यात मोठा गदारोळ माजला होता. डीजे ऑपरेटरने 'तमंचे पर डिस्को' गाणे न वाजल्यामुळे एका व्यक्तीने रागाच्या भरात गोळीबार केला. यामुळे याठिकाणी एक गोंधळ उडाला होता. इतकेच नाही तर आरोपीने डीजे ऑपरेटरला स्टेवरून खाली पाडून मारहाण केली. यादरम्यान कोणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलिस येण्यापूर्वीच आरोपींनी तेथून धूम ठोकली. एमडीसी पोलिसांनी पीडिताच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. 


रात्री 10 वाजता डीजे ऑपरेटरने डीजे बंद केसा. पण काही लोक तिथे गेले आणि म्हणाले की, आम्हाला तमंचे पर डिस्को गाण्यावर डान्स करायचा आहे. यावर डीजे ऑपरेटरने वेळ संपल्याचे सांगितले. यामुळे लोकांनी त्याला स्टेजवरून खाली पाडले आणि मारहाण केली. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी तेथील लोकांची पर्वा न करता अंधाधुंध गोळीबार केला. यामुळे लग्न सोहळ्यात एकच खळबळ उडाली. आरोपी गोळीबार करत असताना एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ बनवला. तो व्हिडिओ पोलिसांकडे देण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...