आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Firing : अमेरिकेतील फूड फेस्टिव्हलमध्ये अज्ञाताकडून गोळीबार, 4 जण ठार, 11 जण जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन/पेरिस - अमेरिकेतील कॅलिफोर्नियात रविवारी एका फूड फेस्टिव्हलमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात 4 जण ठार तर 11 जखमी झाले आहेत. पोलिसांनी या हल्लेखोराला कंठस्नान घातले. तर दूसरीकडे दक्षिण फ्रान्समधील एका गोळीबारात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. 


अमेरिकेतील घटनेनंतर पोलिसांनी ट्वीट केले की 'गिलोयच्या गार्लिक फेस्टिव्हलमध्ये गोळीबार झाला. यातून अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.'  एनबीसी न्यूजनुसार, सॅन जोस शहरापासून 48 किमी दूर अमेरिकेतील सर्वांत मोठ्या फूड फेस्टिव्हलपैकी एक भरतो. वृत्तवाहिनीने प्रत्यक्षदर्शी महिलेच्या हवाल्याने सांगितले की, 30 वर्षाच्या एका व्यक्तीने हा गोळीबार केला आहे. गोळीबार सुरु असताना लोक आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित ठिकाणी जात होते. 

 

अमेरिकेत तब्बल 31 कोटी हत्यारे, 66% लोकांकडे एकापेक्षा अधिक बंदूका
जगभरातील एकूण नागरिकांकडील बंदूकांपैकी 48% बंदुका फक्त अमेरिकेत आहे. अमेरिकन नागिरकांकडे 31 कोटी हत्यार आहेत. 89% अमेरिकी लोक स्वतःकडे बंदुक बाळगतात. यांमधील 66% लोक स्वतःकडे एकापेक्षा अधिक बंदुका ठेवतात. अमेरिकेत बंदुकांची निर्मिती करणाऱ्या इंडस्ट्रीचे वार्षिक उत्पन्न 91 हजार कोटी रुपयांचे आहे. 2.65 लाख लोक या व्यवहाराशी जोडलेले आहेत. अमेरिकी महसुलात हत्यारांच्या विक्रीतून 90 हजार कोटी रुपये मिळतात. दरवर्षी एक कोटींपेक्षा जास्त रिव्हॉल्वर, पिस्टल इत्यादी सारख्या बंदुकाची निर्मिती होते. 

 

गॅस स्टेशनमध्ये गोळीबार 
दुसरीकडे दक्षिण फ्रान्सच्या ओलियूल्स कम्यून स्थित एका गॅस स्टेशनजवळ रविवारी गोळीबार झाला. यामध्ये 3 लोकांचा मृत्यू झाला. सध्या पोलिस आपआपसातल्या वादामुळे गोळीबार झालाय का याबाबत शोध घेत असून प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

बातम्या आणखी आहेत...