आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघरमध्ये डोळ्यात स्प्रे उडवून नगरसेवकावर गोळीबार; खांद्याला चाटून गेली गोळी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- पालघरमधील डहाणू नगरपालिकेचे नगरसेवक भावेश देसाई यांच्यावर गोळीबार करण्‍यात आल्याची घटना समोर आली आहे. भावेश देसाई हे डहाणू जनता सहकारी बॅंकेचे संचालक आहे. गोळी ही देसाई यांच्या खांद्याला चाटून गेल्याने ते जखमी झाले आहे. लुटण्याच्या उद्देशातून हा गोळीबार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

 

मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी (ता.8) रात्री 9 वाजता भावेश देसाई हे हॉटेल सरोवरच्या मागील रस्त्याने दुचाकीवरून जात होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात स्प्रे उडवून देसाई यांच्याकडील बॅग हिसकवण्याचा प्रयत्न केला. परंतु देसाई यांनी हातातील बॅग सोडली नाही. त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार केला. चोरट्यांनी त्यांच्यावर पिस्तूलमधून गोळी झाडली.

 

गोळीबाराचा आवाज ऐकताच रस्त्यावर लोक जमा झाले. लोकांना पाहून चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर देसाई यांना तातडीने शितल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. देसाई यांची प्रकृती स्थीर असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...