आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर गोळीबार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोकुलवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्याबाबत मुंबईतील रुग्णालयाशीही संपर्क साधला. - Divya Marathi
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोकुलवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्याबाबत मुंबईतील रुग्णालयाशीही संपर्क साधला.

नांदेड - काँग्रेसचे माजी नगरसेवक व शहरातील व्यापारी गोविंद कोकुलवार यांच्या शनिवारी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. एक गोळी त्यांच्या पाठीत घुसली. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कोकुलवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्याबाबत मुंबईतील रुग्णालयाशीही संपर्क साधला.   

गोविंद कोकुलवार हे काँग्रेसचे माजी नगरसेवक असून सध्या त्यांचा मुलगा नागेश कोकुलवार हे नगरसेवक आहेत. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला इतवारा हद्दीतील त्यांच्या कार्यालयाजवळ ते गाडी पार्क करीत असताना मोटारसायकलवर आलेल्या दोन जणांनी त्यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. त्यात एक गोळी त्यांच्या पाठीत घुसली. त्यांना ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाॅस्पिटलमध्ये जावून कोकुलवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांना मुंबईला उपचारासाठी हलवण्याबाबत मुंबईतील रुग्णालयाशीही संपर्क साधून माहिती दिली.    
 

बातम्या आणखी आहेत...