आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात घुसून पिस्टल रिकामे होईपर्यंत झाडल्या गोळ्या, पण ज्याच्यावर हल्ला केला त्यानेही शेवटच्या श्वासाआधी केला असा वार की हल्लेखोराचाही झाला मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


फिरोजपूर (पंजाब) : शुक्रवारी संध्याकाळी कुख्यात अमली पदार्थ तस्कर हरभजन सिंहने त्याचा शेजारी बग्गा सिंहची गोळ्या घालून हत्या केली होती. बग्गा सिंहने एक गोळी लागताच तस्कर हरभजन सिंहवर वीट फेकून त्याला जखमी केले होते. यानंतर त्याचा देखील मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेहांना ताब्यात घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली. 

 

बग्गा सिहंच्या भाच्याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी  मृतक तस्कर हरभजन सिंहविरूद्ध खूनाचा आरोप दाखल करून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी रूग्णालयात हरभजनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कोणीही आले नव्हते. पोलिसांनी बग्गा सिंहच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे. दोन लोकांच्या हत्येमुळे किलचा गावात दहशत पसरली आहे. या प्रकरणामुळे गावात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. 

 

तस्कर हरभजन विरुद्ध खूनाचा आरोप दाखल 

शनिवारी रात्री उशीरा झालेल्या हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मृत हेरोइन तस्कर हरभजन सिंहवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. निहाला किलचा गावातील रहिवासी जनरल सिहं यांनी सांगितले की, ते शेती करतात. घरापासून काही अंतरावरच हरभजन सिंहचे घर आहे. हरभजन सिहंचा पूर्ण परिवार हेरोइन तस्करीचे काम करत आहे. त्याचे वडील पोलिसांना त्यांच्या तस्करीबाबत माहिती सांगत असल्याचा हरभजन सिंहच्या परिवाराला संशय होता. त्यामुळे त्यांचा यांच्या परिवारावर राग होता. चार महिन्यांपूर्वीच पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. तेव्हापासून तो त्यांच्या परिवाराला धमक्या देत होता. शुक्रवारी तो त्याच्या साथीदारासोबत त्यांच्या घरात घुसला आणि त्यांच्या वडिलांना चेतावणी देण्यास सुरुवात केली. त्याचे पिता बाहेर येताच त्यांने त्यांच्यावर पिस्टलने गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याच्या वडिलांनी वीट हरभजन सिंहच्या डोक्यात मारली. यामुळे तो जखमी झाला पण पिस्टल रिकामे होईपर्यंत त्यांने वडिलांवर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर तो त्यांच्या खोलीत कोसळला आणि त्यांनी बाहेरून कडी लावली. मी माझ्या वडिलांना घेऊन रूग्णालयात जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी घरी येऊऩ पाहिले असता हरभजन सिंहचा मृत्यू झाला होता. 

 

बग्गावर झाडल्या 6 गोळ्या, 5 गेल्या शरीराच्या आरपार
बग्गा सिंह यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांचे पॅनेल तयार केले होते. यामधेय डॉ. गुराया, डॉ. अभिजीत, डॉ. आंजल यांचा सहभाग होता. पोस्टमार्टम केलेल्या पॅनलने सांगितले की, बग्गा सिंह यांच्या शरीरात 6 गोळ्या लागल्या होत्या. यातील 5 गोळ्या शरीराच्या आरपार झाल्या तर एक गोळी शरीरातून काढली. तर दुसरीकडे पोलिसांकडून तस्कर हरभजन सिहंचे पोस्टमार्टम करण्यात आले. यामध्ये त्याच्या डोक्यावर वीटेसारख्या वस्तूने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांकडून तपास सुरू आहे. 

 

गावात दहशतीचे वातावरण: यामुळे पोलिसांचा चोख बंदोबस्त 
निहाला किलचा गावात दोन लोकांच्या हत्येमुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. तस्कर हरभजनचे साथीदार गावावर हल्ला करतील या भीतीने गावात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बग्गा सिंह यांच्या घराच्या सुरक्षेसाठी पोलिस फोर्स तैनात केली आहे. गावात तैनात करण्यात आलेले पोलिस गावात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पोलिसांनी बग्गा सिंह यांच्या घरातून रक्ताचे नमुने घेतले आहेत. सदर पोलिस प्रभारी मोहित धवन यांनी सांगितले की, त्यांनी तस्कर हरभजन सिंहचे एक पिस्टल 9 एमएम, दोन मॅगजीन, 11 जीवंत काडतूसे आणि 11 रिकामे ताब्यात घेतले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...