आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील पहिल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा पुन्हा श्रीगणेशा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- उस्मानाबाद विमानतळावर चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि काही महिन्यांतच बंद पडलेल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा बुधवारी पुन्हा एकदा श्रीगणेशा  झाला. बारामती येथील ब्लू रे एव्हिएशन कंपनीने २०१२ मध्ये हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. मात्र काही महिन्यानंतर ते बंद झाले. मात्र कंपनीची विमाने जागीच उभी होती. अहमदाबाद येथील उद्योजक राजीव गांधी यांनी हेे केंद्र विकत घेतले आहे. 


या केंद्रात सध्या दुबईसह दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, पुणे, केरळ येथील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी  दाखल झाले आहेत. त्यांना दिल्ली येथील चीफ कॅप्टन राजीव भल्ला  प्रशिक्षण देत असून सहकारी म्हणून अहमदाबाद येथील कॅप्टन फरहान अल्वी काम पाहत आहेत. मॅनेजर गौरंग शहा, चीफ इंजिनिअर यात्रिक मेवाडा यांच्या देखरेखीखाली केंद्राचे व्यवस्थापन सुरू आहे.


पहिला विद्यार्थी झाला वैमानिक
स्मानाबाद वैमानिक केंद्रात २०१२ मध्ये प्रवेश घेतलेला अझरुद्दीन काझी नुकताच वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन एका कंपनीमध्ये वैमानिक म्हणून रुजू झाला आहे. त्याने उस्मानाबादेतील केंद्र बंद झाल्यानंतर परदेशात जाऊन प्रशिक्षण पूर्ण केले होते.

 

दीड वर्षाचा कोर्स
व्यावसायिक वैमानिकांसाठी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनची ६ वेळा लेखी परीक्षा द्यावी लागते. तसेच २०० तास विमान चालवावे लागते. त्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागतो. तर वैयक्तिक विमानांसाठी ५० तास विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन ३ परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी ८ महिन्यांचा कालावधी लागतो. प्रशिक्षण कालावधी उस्मानाबादच्या धावपट्टीवरून हैदराबाद, बारामती, औरंगाबाद, पुण्यापर्यंत जाता येते. म्हणजे १ हजार किलोमीटरपर्यंत परिघात व १२ ते १३ हजार फूट उंचीपर्यंत विमाने उडवता येतात, असे कॅप्टन राजीव भल्ला यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...