Home | International | Other Country | First Case Of Pregnancy Through Mouth Shocks The Doctors in S Korea

Weird: तोंडातून गर्भधारणा झालेली जगातील पहिली महिला, चाचण्या घेऊन डॉक्टरही चक्रावले; वाचा नेमके काय घडले

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 02, 2018, 12:00 AM IST

दक्षिण कोरियाच्या एका महिलेची चाचणी केली असता डॉक्टर आणि संशोधक सुद्धा हैराण आहेत.

 • First Case Of Pregnancy Through Mouth Shocks The Doctors in S Korea

  सेऊल - तोंडातून गर्भधारणा झाल्याचे जगातील पहिले प्रकरण समोर आले आहे. दक्षिण कोरियाच्या एका महिलेची चाचणी केली असता डॉक्टर आणि संशोधक सुद्धा हैराण आहेत. विशेष म्हणजे, तिच्या तोंडातच ही गर्भधारणा झाली आहे. एका मेडिकल जर्नलच्या माहितीनुसार, दक्षिण कोरियात राहणाऱ्या एका 63 वर्षीय महिलेच्या तोंडात स्क्वि़डने (सागरी जीव) आपले स्पर्म सोडले. त्यातूनच तिच्या जिभेखाली आणि हिरड्यांमध्ये 12 पिल्ले तयार झाले होते. ही घटना 2012 ची असल्याचे जर्नलमध्ये लिहिण्यात आले आहे.


  असे आहे प्रकरण...
  जर्नल ऑफ पॅरासाइटोलॉजीच्या लेखनुसार, या महिलेने एका रेस्टॉरंटमध्ये कालामारी ऑर्डर दिली होती. कालामारी एक सीफूड असून ते सागरी जीव स्क्विडपासून तयार केले जाते. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिने स्क्वि़ड तोंडात ठेवले. पण, खाल्ले नाही. हे स्क्विड पूर्णपणे शिजले नव्हते, ते जिवंत होते. तोंडात ठेवताच तिला कीटक चावल्याचा भास झाला. घाबरलेल्या महिलेने वेळीच ते थुंकून दिले.


  वैद्यकीय तपासानंतर धक्काच बसला
  या प्रकरणावर महिलेने दुर्लक्ष केले होते. परंतु, काही दिवसांनंतर तिच्या तोंडात तीव्र वेदना सुरू झाल्या. डॉक्टरांची तिची वैद्यकीय चाचणी घेतली तेव्हा सर्वांना शॉक बसला. तिच्या जीभ आणि हिरड्यांभोवती 12 पिल्ले पाळली जात आहेत. तसेच तिचे तोंड गरोदर असल्याचे समोर आले. महिलेने आपली आपबिती सांगितली तेव्हा डॉक्टरांनी हे जगातील पहिलेच प्रकरण मानले. प्रत्यक्षात ती जे स्क्विड खाण्याचा प्रयत्न करत होती, ते नर होते. त्याने तोंडात जाताच या महिलेच्या जीभ आणि हिरड्यांमध्ये आपले स्पर्म इंजेक्ट केले होते. त्यामुळेच महिलेला आपल्या तोंडात कीटक चावत असल्याचा भास झाला होता. डॉक्टरांनी छोटीशी सर्जरी करून ते सर्व जीव बाहेर काढले आहेत.

Trending