Home | Sports | From The Field | First century in England

इंग्लंडमध्ये पहिले शतक; भारतीय संघाच्या पहिल्या डावात २७४ धावा

वृत्तसंस्था | Update - Aug 03, 2018, 09:09 AM IST

काेहलीने (१४९) यजमान इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसाेटीला पहिल्या डावात एकाकी झंुज देताना गुरुवारी टीम इंडियाचा डाव सावरला.

 • First century in England

  बर्मिंगहॅम- कर्णधार विराट काेहलीने (१४९) यजमान इंग्लंडविरुद्ध सलामीच्या कसाेटीला पहिल्या डावात एकाकी झंुज देताना गुरुवारी टीम इंडियाचा डाव सावरला. त्याने इंग्लंडच्या खेळपट्टीवर अापले पहिले शतक साजरे केले. यामुळे निराशेतून सावरताना भारताने पहिल्या डावात २७४ धावा काढल्या. काेहलीच्या शतकाने संघाच्या धावसंख्येला गती मिळाली. त्यानंतर यजमान इंग्लंडने दिवसअखेर दुसऱ्या डावाला सुरुवात केली. यादरम्यान इंग्लंडने १ बाद ९ धावा काढल्या. अाता यजमानांकडे २२ धावांची अाघाडी अाहे. टीमचा कुक हा भाेपळा न फाेडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मैदानावर अाता जेनिंग्स (नाबाद ५) खेळत अाहे. भारताकडून अश्विनने १ विकेट घेतली. यजमान इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या २८७ धावांवर गुंडाळला.

  भारताकडून पहिल्या डावात काेहलीची खेळी लक्षवेधी ठरली. त्याने तळातल्या फलंदाजांसाेबत शानदार खेळी करताना धावसंख्येचा अालेख उंचावला. यातून इंग्लंडचे माेठ्या अाघाडीचे मनसुबे उधळले गेले. इंग्लंड संघाने कालच्या ९ बाद २८५ धावांवरून गुरुवारी दुसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, सॅम कुरन (२४) अाणि अँडरसन यांनी सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शमीने सॅमची विकेट काढली अाणि इंग्लंडचा खुर्दा उडवला. त्यामुळे इंग्लंड संघाला २८७ धावा काढता अाल्या. सॅम कुरनने २४ धावांची खेळी केली.


  लाेकेश, कार्तिकची निराशा
  भारताच्या युवा फलंदाज लाेकेश राहुल अाणि दिनेश कार्तिकने पहिल्या डावात निराशा केली. त्यांना फार काळ मैदानावर अाव्हान कायम ठेवता अाले नाही. यातूनच हे दाेघेही झटपट बाद झाले. लाेकेश ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर कार्तिकला भाेपळाही फाेडता अाला नाही. त्याला स्टाेक्सने त्रिफळाचीत केले. यातून कार्तिकचे माेठ्या खेळीचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरले.


  अन् एकाच डावात विक्रम
  विराट काेहलीने २०१४ च्या इंग्लंड दाैऱ्यात १३४ धावा काढल्या हाेत्या. त्याला दहा डावांत हा पल्ला गाठता अाला. मात्र, अाता चार वर्षांत प्रचंड मेहनतीच्या बळावर त्याने कामगिरीचा दर्जा उंचावला. यासह त्याने अाता दाैऱ्यातील पहिल्याच डावात १४९ धावा काढल्या. त्याचा हा विक्रम ठरला.


  पहिले शतक साजरे
  इंग्लंड दाैऱ्यातील अपयश हे अापल्या करिअरमधील माेठी उणीव अाता काेहलीने दूर केली. त्याने अत्यंत संयमी खेळी करताना इंग्लंडमध्ये करिअरमधील पहिले शतक साजरे केले. त्याने २२५ चेंडूंचा सामना करताना २२ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे १४९ धावांची खेळी केली. ही त्याची इंग्लंडमधील सर्वाेत्तम खेळी ठरली.

Trending