Home | International | Other Country | first class aircraft travel ban to prime minister, president in pakistan

पाकमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधानांच्या प्रथम श्रेणी विमान प्रवासावर बंदी; इम्रान सरकारचा निर्णय

वृत्तसंस्था | Update - Aug 26, 2018, 08:32 AM IST

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने खर्चात कपात करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांसह उच्चपदस्थ व्यक्तींच्या प्

  • first class aircraft travel ban to prime minister, president in pakistan

    इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने खर्चात कपात करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधानांसह उच्चपदस्थ व्यक्तींच्या प्रथम श्रेणी विमान प्रवासावर बंदी घातली आहे.


    कॅबिनेट बैठकीनंतर मंत्री फवाद चौधरी म्हणाले, मुख्य न्यायमूर्ती, सिनेटचे अध्यक्ष, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री यांनाही आंतरराष्ट्रीय विमानाच्या प्रथम श्रेणी प्रवासाचा खर्च दिला जाणार नाही. अर्थात तसा प्रवास करण्याचा अधिकार आता त्यांना राहिलेला नाही. ते बिझनेस किंवा क्लब क्लासमधूनच विमान प्रवास करू शकतील. पंतप्रधानही विशेष विमानाऐवजी बिझनेस क्लासने परदेशात जातील. लष्करप्रमुखांना पूर्वीपासूनच विमानाच्या प्रथम श्रेणीची सुविधा दिली जात नव्हती. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी एक वर्षात ५१ अब्ज रुपयांची विनाकारण उधळपट्टी केली, असा आरोपही चौधरी यांनी केला.

    डिझेल दरांत १७ रुपयांनी घट
    पेट्रोलियम मंत्री गुलाम सरवर म्हणाले, डिझेलचे दर १७ रुपयांनी घटतील.पाकमध्ये डिझेल ११२.९४ व पेट्रोल ९५.२४ रुपये लिटर आहे. डिझेल व पेट्रोलचा दर समान ठेवण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.

Trending