आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहेल्थ डेस्क - अटलजींच्या निधनानंतर त्यांचा सर्वात चांगला फोटो समोर आला आहे. त्यात त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. अटलजींना किडनी तसेच युरीन इन्फेक्शनमुळे एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. 2009 पासून ते व्हील चेअरवर होते आणि डिमेंशियाने पीडित होते. वाजपेयी यांना 2009 मध्ये स्ट्रोक आला होता. नुकताच अटलजींचा निधनानंतरचा एक जवळचा फोटो समोर आला आहे. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर आजारणाचा परिणाम स्पष्ट दिसत आहे. त्यांना झालेल्या आजारांबाबत आपण जाणून घेऊ.
डिमेंशिया
डिमेंशियाग्रस्त व्यक्तीला रोजची कामेही नीट करता येत नाहीत. त्यांची स्मरणशक्ती कमकुवत बनते. बोलता बोलता ते शब्द विसरतात.
युटीआय
त्यांना युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय) चीही समस्या होती. सोप्या शब्दांत सांगायचे तर मूत्रमार्गात होणारे हे इन्फेक्शन असते.
डायबिटीज
अटलजींना डायबिटीज(मधुमेह) देखिल होता. अगदी साधारण वाटणाऱ्या या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असते. त्याचा परिणाम होऊन किडनी खराब होते.
किडनीची समस्या
अटलजींची एकच किडनी काम करत होती. डायबिटीज वाढल्याने अनेकदा किडनी खराब होते. डॉक्टर्सने त्यांच्या शरिरातील इतर अवयवांनादेखिल इन्फेक्शन झाल्याचे सांगितले होते.
जाणून घ्या अटलजींना झालेल्या डिमेंशिया आजाराबाबत..
काय आहे डिमेंशिया
डिमेंशियाहा अल्झाइमर किंवा स्ट्रोक सारख्या आजारांमुळे ब्रेन डॅमेज झाल्याने होत असतो. बहुतांश लोकांना हा आजार विसरण्याचा आजार म्हणून माहिती आहे. डिमेंशियावर अद्याप काही उपचार मिळालेला नाही. डिमेंशिया झालेल्या व्यक्तीला रोजची कामेही नीट करता येत नाहीत. स्मरणशक्ती कमी होते. कधी-कधी त्याला नाव, वर्ष आणि महिनाही लक्षात राहत नाही. हा आजार झालेला असल्यास व्यक्ती बोललेले शब्दही विसरत असतो. वय वाढल्यास लोकांना हा आजार होत असतो.
डिमेंशियाचे लक्षण
- डिप्रेशनमध्ये जाणे
- बोलण्यात अडचण निर्माण होणे आणि वागण्यात बदल होणे
- खाण्या-पिण्यात गिळण्यात अडचण होणे
- चालण्यात अडचण येणे
- निर्णय घेण्याची क्षमता गमावणे
- छोट्या छोट्या समस्या सोडवण्यात अडचण येणे
- रस्ता विसरणे
- एखादी वस्तू, चित्र पाहून ते ओळखता न येणे
- बेरीज - वजाबाकीत अडचणी येणे
असे होते किडनी इन्फेक्शन
> न्यूयॉर्कच्या माऊंट सिनाई हॉस्पिटलचे नेफ्रोलॉजिस्ट आणि एमडी Staci Leisman यांनी त्यांच्या रिसर्चमध्ये सांगितले की, निरोगी लोकांना किडनी इनफेक्शन होण्याची शक्यता कमी असते.
> हा आजार शक्यतो ब्लड प्रेशर किंवा डायबिटीजच्या रुग्णांना होतो.
> किडनीला इन्फेक्ट करणारे बॅक्टेरिया युरिनरी ट्यूबद्वारे शरिरात पोहोचतात आणि नंतर ब्लॅडरद्वारे किडनीपर्यंत येतात.
> इंफेक्शनवर उपचार करता येतात पण इन्फेक्शन वाढले तर किडनी फेलही होऊ शकते.
> त्यामुळे किडनीचे गंभीर आजार होऊ शकतात त्यामुळे UTI (युरीनरी ट्रेक्ट इन्फेक्शन) ची लक्षणे आढळताच डॉक्टरला दाखवा.
पुढे पाहा, अटलजींचे अखेरच्या दिवसांतील इतर काही Photo
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.