आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Corona Patient Found In Kerala, Student Diagnosed With Illness Who Came From Wuhan

भारतात 'कोरोना'चा पहिला रुग्ण केरळात आढळला, वुहानवरून आलेल्या विद्यार्थिनीला आजार झाल्याचे निदान

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुवअनंतपुरम : चीनमध्ये उद्रेक केलेल्या कोरोना व्हायरसची पावले भारताकडेही वळली आहेत. भारतातील पहिला रुग्ण केरळात आढळला आहे. चीनच्या वुहान विद्यापीठातून भारतात परतलेल्या विद्यार्थिनीला कोरोनाचे निदान झाले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा यांनी सांगितले की, पीडितेची प्रकृती स्थिर असून तिला त्रिशूरच्या रुग्णालयात आयसोलेशन वार्डात ठेवण्यात आले आहे. २० नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यात कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले.

चीनमधील भारतीयांना परत आणण्याची तयारी

कोरोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहान शहरात अडकलेल्या भारतीयांना काढण्यासाठी तेथे दोन विमाने पाठवण्याची विनंती केंद्र सरकारने चीनकडे केली आहे. बीजिंगमधील भारतीय दूतावासाने म्हटले आहे की, शुक्रवारी संध्याकाळी एअरलिफ्टिंगची मोहीम सुरू केली जाऊ शकते. वुहान व परिसरातून पहिल्या विमानात भारतीयांना मायदेशी आणले जाईल. दुसऱ्या विमानात हुबेई प्रांतातील भारतीयांना अाणले जाणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...