आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office Collection: पहिल्या दिवशी रजनीकांत आणि अक्षय कुमारच्या 2.0 ने जमवला कोट्यवधींचा गल्ला, केली एवढी कमाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड डेस्कः भारतातील सर्वांत महागडा चित्रपट ‘2.0’ गुरुवारी प्रदर्शित झाला आणि पहिल्या शोपासूनच प्रेक्षकांनी गर्दी केली. रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. त्यामुळे तिकिटबारीवरही ‘2.0’ने ‘बाहुबली’ आणि ‘अॅव्हेंजर्स’ या चित्रपटांचा विक्रम मोडला. या चित्रपटाने पहिल्या दिवशी घसघशीत कमाई केली आहे. ‘2.0’ हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित झाला. त्यापैकी हिंदी भाषेतील पहिल्या दिवसाची कमाई 20.25 कोटी रुपये झाली आहे. 
 
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने यासंदर्भातील माहिती ट्विटरद्वारे दिली आहे. सुट्टी किंवा सणासुणीचा दिवस नसताना आणि आगाऊ बुकींगसुद्धा उशिरा सुरू झाली असतानाही या चित्रपटाची कमाई चांगली झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तामिळ आणि तेलुगू भाषेतील कमाई अद्याप समजू शकली नाही.

Non-holiday release... Non-festival period... Yet, #2Point0 takes a SUPER START... Keeping in mind the fact that it’s a dubbed film + advance bookings opened very late, the biz is STRONG... Thu ₹ 20.25 cr. India biz. Note: HINDI version.

— taran adarsh (@taran_adarsh) November 30, 2018
रिलीजपूर्वीच वसूल झाला खर्च... 
‘2.0’च्या ट्रेलरनेही पहिल्याच दिवशी विक्रम केला होता. अवघ्या 24 तासांत डिजीटल प्लॅटफॉर्मवर या ट्रेलरला तब्बल 2 कोटी 50 लाख व्ह्यूज मिळाले होते. या चित्रपटाचे एकुण बजेट 543 कोटी रुपये आहे, तर रिलीजपूर्वीच या चित्रपटाने तब्बल 490 कोटींची कमाई केली आहे.  
 
सॅटेलाइट राइट्स (सर्व व्हर्जन) 120 कोटी रुपये
डिजिटल राइट्स (सर्व व्हर्जन) 60 कोटी रुपये
नार्थ बेल्ट राइट्स 80 कोटी रुपये
आंध्र/तेलंगना राइट्स 70 कोटी रुपये
कर्नाटक राइट्स 25 कोटी रुपये
केरळ राइट्स 15 कोटी रुपये
प्री बुकिंग (तामिळ) 120 कोटी रुपये
एकुण कमाई 490 कोटी रुपये

बातम्या आणखी आहेत...