आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सिडनी - ऑस्ट्रेलिया विरोधातील कसोटी मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या दिवशी भारताची चांगली सुरुवात झाली. भारताने दिवसअखेर चार विकेट गमावत 303 धावा केल्या. चेतेश्वर पुजाराने मालिकेतील तिसरे आणि करिअरचे 18 वे शतक पूर्ण केले. तो 130 धावांवर नाबाद आहे. तर मयांक अग्रवालनेही 77 धावा करत मोलाची कामगिरी केली. लोकेश राहुल मात्र पुन्हा अपयशी ठरला आहे. कोहली 23 आणि राहाणे 18 देखिल स्वस्तात बाद झाले. ऑस्ट्रेलियाच्या हेजलवूडने सर्वाधिक दोन तर स्टार्क आणि लियोनने प्रत्येकी एक विकेट घेतली. विराटने टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
पुजाराने ऑस्ट्रेलिया विरोधात 5 वे कसोटी शतक
पुजाराने ऑस्ट्रेलिया विरोधातील या मालिकेतील तिसरे शतक पूर्ण केले. त्याने अॅडिलेड आणि मेलबर्नमध्येही शतक केले. पुजाराच्या करिअरचे हे 18 वे तर ऑस्ट्रेलिया विरोधातील 5 वेश शतक होते. पुजाराने या डावात अर्धशतक आणि शतक दोन्ही चौकार लगावत पूर्ण केले.
Take a bow, Cheteshwar Pujara!
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2019
Another outstanding knock for his fifth Test ton against Australia.#AUSvIND | @Domaincomau pic.twitter.com/n692cZ7WrC
गावस्करच्या विक्रमाची बरोबरी
पुजाराने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिकेत प्रथमच तीन शतके केली आहेत. यासह त्याने गावस्करचत्या विक्रमाची बरोबरी केली. गावस्करने 1977/78 मध्ये झालेल्या मालिकेत तीन शतके केली होती. या यादीत कोहली आघाडीवर आहे. त्याने 2014/15 मध्ये मालिकेत चार शतके केली होती. पुजाराने या मालिकेत चौथ्यावेळी 200 हून अधिक चेंडू खेळले. याबाबतीतही त्याने गावस्करला मागे टाकले. गावस्करने 1977/78 मध्ये झालेल्या मालिकेत 200 हून जास्त चेंडू खेळले होते.
खराब सुरुवातीनंतर मयांक-पुजाराने सावरला डाव
सामन्यात भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लोकेश राहुल दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यावेळी भारताचा स्कोअर फक्त 10 होता. पण नंतर मयांक अग्रवाल आणि पुजाराने डाव सावरला. त्यांनी 116 धावांची भागीदारी केली.
That's a ripper from Mitch Starc 🔥
— cricket.com.au (@cricketcomau) January 3, 2019
Stream via Kayo here: https://t.co/CaiEbSjKbT #AUSvIND pic.twitter.com/dlNsClxxAl
दोन्ही टीमने बांधल्या काळ्या फिती...
भारतीय संघाने क्रिकेट कोच गुरुवर्य रमाकांत आचरेकर यांच्या निधनामुळे हातावर काळ्या फिती बांधून शोक व्यक्त केला. तर ऑस्ट्रेलियाच्या टीमने बिल वॉटसन याच्या स्मरणार्थ हातावर काळ्या फिती बांधल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.