आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दत्तक पित्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले नाशिकवरील 'प्रेम'; राज्यातील पहिला डिफेन्स हब नागपूरला; नाशिकला ठेंगा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- संरक्षण सामग्री अाणि एराेस्पेससाठी अावश्यक उत्पादनांच्या निर्मितीसाठी मुबलक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याने नाशिकमध्येच डिफेन्स हब उभारला जार्इल अशी घाेषणा थेट मुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांनी करून दीड वर्ष उलटले तरी यासंदर्भातील साधी बैठकही नाशिकमध्ये झाली नाही. नाशिककर मात्र या हबची प्रतीक्षा करीत असतानाच मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये पहिल्या डिफेन्स हबला शासनाने मंजुरी दिली असून, हा प्रकल्प मिहानमध्ये साकारला जाणार अाहे.

 

पीपीपी तत्त्वावरील २१७ काेटींच्या या प्रकल्पासाठी २० एकर जागा अाणि १४६ काेटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी घेतला असून, या प्रकल्पातून ५० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार अाहे. नाशिककरांना मात्र यानिमित्ताने पुन्हा ठेंगा मिळाला असून, 'दत्तक' पुत्रावरील पित्याचे प्रेम पुन्हा एकदा समाेर अाले अाहे. 


मुंबर्इतील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब कंपनीला मिहान येथील सेक्टर १० मधील सुमारे २० एकर भूखंड संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी देण्याबाबतचा प्रस्ताव आजच्या बैठकीत मंजूर करण्यात अाला अाहे

बातम्या आणखी आहेत...