आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरचा नवा फोटो आला समोर, दोघांच्या ड्रायव्हर आणि बॉडीगार्डसोबत दिसले दीपवीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण आता विवाहबंधनात अडकले आहे. इटलीमध्ये दोन पध्दतींनी त्यांचा लग्न सोहळा पार पडला. बुधवारी दीपिका आणि रणवीरने कोंकणी पध्दतीने लग्न केले तर गुरुवारी सिंधी पध्दतीने त्यांचे लग्न झाले. गुरुवारी रात्री दीपिका आणि रणवीर दोघांनीही दोन्ही पध्दतींच्या लग्नामधील फोटो शेअर केले होते. त्यांच्या लग्नाचे अजून काही फोटोज समोर आले आहे. यामध्ये ते आपले स्टाफ मेंबर्स म्हणजेच बॉडीगार्ड, ड्रायव्हर, मेकअपमॅन, हेअरस्टायलिस्ट आणि मॅनेजरसोबत दिसत आहेत. नवरदेव-नवरीच्या रुपातील दीपवीरचे अजून फक्त चारच फोटोज समोर आले आहेत.

 

दीपिकाच्या कुटूंबाने रणवीरला गिफ्ट केली अंगठी
- कोंकणी पध्दतीने झालेले लग्न खुप इंटरेस्टिंग होते. रणवीर यासाठी हातात ज्वेलरी घेऊन होता. त्याच्या डोक्यावर मोत्यांनी बनलेली माळ होती. तर दीपिकाच्या हातात काही कपडे आणि चार तांबे होते. जो फोटो समोर आला आहे यामध्ये एक कोंकणी लग्नाची पध्दत दिसत आहे. रणवीरच्या  डोक्यावर मुंडावळ्याही दिसत आहेत. रणवीरला दीपिकाच्या कुटूंबाने एक सोन्याची अंगठी गिफ्ट केली. तर दीपिकाच्या हातात तिची डायमंड रिंग आहे. तिची डायमंड रिंग स्क्वेअर शेपमध्ये आहे. सामान्य रिंग या राउंड शेपमध्ये डायमंडमध्ये असतात. ही सिंगल सोलिटेयर स्क्वेअर डायमंड रिंग खुप महागडी आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...