आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Focus On Work, Then Dreaming Of Deputy CM,, Daughter Of RR Patil Said To Aditya Thackeray

लाेकांची कामे आधी करा, मग उपमुख्यमंत्रिपदाचेे स्वप्न पाहा, आर आर पाटील यांच्या मुलीचा आदित्यना टाेला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेखर मगर

तासगाव (जि. सांगली) - आर. आर. पाटील (आबा) यांनी गुटखाबंदी, डान्सबारबंदी केली. फडणवीस आणि मोदींचे सरकारे मात्र उद्योगधंदे बंद करून युवकांना बेरोजगार करत आहे. व्यसनाधीन करण्यासाठी डान्सबारही सुरू करत आहे. शिवरायांच्या गडकिल्यांवर ‘छमछम’ सुरू करून ऐतिहासिक वारसास्थळांचे विडंबन केले जात आ​हे, अशी टीका आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना केली. शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या आदित्य ठाकरेंनी आधी चांगले काम करून दाखवावे. त्यानंतरच उपमुख्यमंत्री होण्याची स्वप्न पहावीत, असा टाेला त्यांनी लगावला. यंदा सत्तांतर होणार असल्याने आदित्यला संधी नाही, असा दावाही त्यांनी केला. 

आई सुमन पाटील यांचा तासगावात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या बाेलत हाेत्या. स्मिता म्हणाल्या, ‘आघाडी सरकारने अनेक चांगल्या याेजना राबवल्या. मात्र या योजनांचे नामकरण करण्यातच अाताचे सरकार धन्यता मानत आहे. आया-बहिणींवर बलात्काराचे प्रमाण वाढले आहे. सरकार मात्र सत्तेचा दुरूपयोग करून विरोधी पक्षांना संपवण्याचे कारस्थान करत आहे. पण आता जनता शहाणी झाली आहे. त्यामुळे यंदा सत्तांतर अटळ आहे.’

गेल्या वेळी आबांच्या निधनामुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली अन् त्यामुळे सुमनताई विजयी झाल्या. पण २०१५ नंतर साडे चार वर्षांत त्यांनी मतदारसंघात शंभर कोटींचे कामे केली आहे. राज्यात आणि केंद्रात सत्ता नसताना माेठा निधी खेचून आणल्यामुळे मतदार खुष आहे. त्यामुळे यंदा सहानुभूती नव्हे तर आपुलकीचे नाते आणि विकासाच्या मुद्यावर आई विक्रमी मतांनी विजयी हाेईल,’ असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
 

राेहितला जनता स्वीकारेल की नाही हे काळच ठरवेल
धाकटा भाऊ रोहितचे वय कमी असल्यामुळे ताे निवडणुकीत उभा नाही. त्याच्यात आबांची छबी दिसते. पुढील वेळी ताे आमदार होईल का..? या प्रश्नावर स्मिता म्हणाल्या, ‘लोकांना घराणेशाही आवडत नाही. सध्या तरी तो कार्यकर्ताच आहे. लोकांचे प्रश्न सोडवतोय. जनता त्याला स्वीकारेल की नाही हे काळच ठरवील.’