स्मार्टफोन / प्रथमच गुगल सेवेविना हुवावेचा स्मार्टफाेन बाजारात;' यात गुगल मॅप्स, यूट्यूब, जीमेल सुविधांचा नसणार समावेश

या डिव्हाइसमध्ये​​​​​​​ गुगल मॅप्स, यूट्यूब, जीमेल सुविधा नसतील

Sep 20,2019 10:34:00 AM IST

म्युनिच - चिनी कंपनी हुवावेने प्रथमच गुगल सेवेशिवाय स्मार्टफाेन लाँच केला आहे. मेट ३० नावाचा हा स्मार्टफाेन गुरुवारी जर्मनीच्या म्युनिचमध्ये लाँच केला. मेट ३० ला अँड्रॉइड प्लॅटफाॅर्मवरच बनवले आहे, मात्र यामध्ये अँड्रॉइड तयार करणारी कंपनी गुगलचे काेणतेही अॅप्लिकेशन यात नाही. म्हणजे या फाेनमध्ये गुगलची काेणतीही सेवा नसेल, ज्याच्याविना अँड्रॉइड फाेनची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. यात जीमेल, गुगल मॅप्स आणि गुगल प्ले स्टाेअर नसेल. परिणामी या फाेनमध्ये गुगल प्ले स्टाेअरवर असणारे काेणतेही एक्स्लुझिव्ह अॅप नसतील. मेट ३० स्मार्टफाेनच्या युजर्सला कार रेंटल आणि फूड डिलिव्हरी सेवेचा वापर करण्यातही अडचण येऊ शकते. या व्यवसायात असलेल्या बहुतांश कंपन्या आपल्या सेवेसाठी गुगल मॅप्सवर अवलंबून आहेत.


अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धात हुवावेला अनेक अमेरिकी कंपन्यांची सेवा बंद करावी लागली आहे. मात्र, आतापर्यंत हुवावेवर अँड्रॉइडच्या वापरावर बंदी घातली नाही. असे असूनही चिनी कंपनीने नुकतेच आॅपरेटिंग सिस्टिम हार्माेनी सादर केली हाेती. सध्या आेएसचा वापर केवळ टीव्हीमध्ये केला जात आहे. हुवावेने सांगितल्यानुसार, ते कधीही आेएसला स्मार्टफाेनमध्ये वापर करण्यास सक्षम आहेत.

२०१८ : दुसऱ्या तिमाहीत हुवावेची ५.६ काेटी विक्री
हुवावे सध्या दक्षिण काेरियाई कंपनी सॅमसंगनंतर विक्रीत जगातील दुसरी सर्वात माेठी कंपनी आहे. २०१९ च्या दुसऱ्या तिमाहीत हुवावेचा जागतिक बाजारातील वाटा १६% हाेता. सॅमसंग २२% साेबत पहिल्या क्रमांकावर आहे. या तिमाहीत हुवावेने जगभरात एकूण ५.६६ काेटी स्मार्टफाेन विकले. यादरम्यान सॅमसंगने ७.६३ काेटी डिव्हाइस विकले. हाच वेग राहिल्यास हुवावे आगामी काळात सॅमसंगला मागे टाकू शकते, असे मानले जाते.

X