आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • First Indian Olympic Medal Winner Khashaba Dadasaheb Jadhav Death Anniversary

...तर \'ब्राँझ\'पासूनही वंचित राहिले असते खशाबा! भारताच्या पहिल्या Olympic मेडलची रोमहर्षक गाथा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारताचे पहिले ऑलिम्पिकवीर खशाबा जाधव यांच्या रक्तातच कुस्ती होती. 5 वर्षांचे असताना त्यांनी डावपेच शिकण्यास सुरुवात केली. 8 वर्षांचे झाले तेव्हा आपल्या परिसरातील सर्वात जबरदस्त पैलनानाला अवघ्या 2 मिनिटातच चित केले. थोडेशे मोठे झाले तेव्हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सर्व गोष्टी सोडून त्या लढ्यात सहभागी झाले. स्वातंत्र्यानंतर त्यांच्यातील पैलवान पुन्हा जागा झाला. त्याचवेळी त्यांनी शपथ घेतली की जगातील सर्वात मोठी स्पर्धा ऑलिम्पिकमधून भारतासाठी मेडल आणणारच. त्यांनी जिद्दीवर देशासाठी ऑलिम्पिकचे पहिले सिंगल पदक आणले. 15 जानेवारी 1926 ला जन्मलेले खाशाबा जाधव यांनी 14 ऑगस्ट रोजी अखेरचा श्वास घेतला. त्याच निमित्ताने आम्ही आपल्याला भारताच्या त्याच पहिल्या ऑलिम्पिक मेडलची रोमहर्षक गाथा सांगत आहोत.


जगातील सर्वोच्च ऑलिम्पिक क्रीडा कुंभमेळ्यात भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकण्याचा पराक्रम कराडच्या मराठमोळ्या खाशाबा जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकी स्पर्धेत घडविला. तो दिवस होता 23 जुलै. म्हणजेच खाशाबांच्या या ऐतिहासिक पराक्रमाला मागील महिन्यात तब्बल 64 वर्षे झाली. खाशाबांनंतर भारताला लिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकासाठी तब्बल 44 वर्षे वाट पाहावी लागली. त्यावरून खाशाबांनी 23 जुलै 1952 साली मिळविलेल्या कांस्यपदकाचे महत्त्व खर्‍या अर्थाने अधोरेखित होते.


फिनलंड देशाच्या राजधानीतील 15 व्या हेलसिंकी ऑलिंपिक स्पर्धेत फ्री स्टाइल बँटमवेट कुस्ती गटात खाशाबांनी कॅनडा, मेक्सिको, जर्मनीच्या मल्लांना चीतपट करून कांस्यपदक पटकविण्याची किमया 23 जुलै 1952 रोजी घडविली. कॅनडा, जर्मनीच्या मल्लांना चीत करून त्यांनी कांस्यपदक खेचून आणले होते. कराडजवळील गोळेश्‍वर गावातील एका शेतकर्‍याच्या मुलाने ऑलिंपिक पदकाला गवसणी घातली होती. त्यांनी पदक जिंकले तेव्हा आजच्यासारखी प्रसारमाध्यमे कार्यरत नव्हती. 


कोल्हापूरच्या महाराजांनी केला होता पहिल्या ऑलिंपिकचा खर्च...
खशाबा जाधव यांनी सन 1948 मध्ये पहिल्यांदा ऑलिंपिकमध्ये भाग घेतला होता. तेव्हा कोल्हापुरच्या महाराजांनी त्यांच्या लंडन दौ-याचा खर्च केला होता. मात्र, त्यावेळी ते एकही कुस्ती सामना जिंकू शकले नव्हते. 
- यानंतर त्यांनी 1952 मधील हेलंसकी येथे झालेल्या ऑलिंपिकला क्वालीफाय केले. मात्र तेथे जाण्यासाठी त्यांना पैसे नव्हते. त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केले व निधी जमवला. घरच्या लोकांनी त्यांना पैसे गोळा करण्यासाठी मदत केली. 
- राज्य सरकारकडे वारंवार मदत मागितल्यानंतर त्यांना चार हजारांची मदत दिली गेली. मात्र, तरीही पैसे कमी पडत होते. अशा वेळी त्यांनी आपले घर आपल्या कॉलेजच्या प्राचार्याकडे गहाण ठेवले. यानंतर त्यांच्या प्राचार्यांनी त्यांना सात हजार रुपयांची मदत केली.


पदकाचे स्वप्न समुद्रात पाहिले
कुस्तीपंढरी कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात बी. ए. चे शिक्षण घेत असतानाच, खाशाबांनी 1948 मध्ये लंडन ऑलिंपिकमध्ये सहावे स्थान पटकाविले होते. लंडनच्या ऑलिंपिकला त्यांनी बोटीतून कंटाळवाणा प्रवास केला होता. ऑलिंपिक पदकाचा निर्धार त्यांनी इंग्लंडमध्येच केला होता. एक-एक रुपया गोळा करून खाशाबांनी दुसरी ऑलिंपिक वारी केली होती. कोल्हापूरच्या मराठा बँकेने त्यावेळी 3000 रुपये कर्ज दिले नसते, तर खाशाबांना हेलसिंकीला जाण्याचा मार्ग बंद झाला असता.


तर त्या ऐतिहासिक पदकाबाबत देश आणि खशाबाही मुकले असते
या अडथळ्यांची शर्यत जिंकत असताना, ज्यादिवशी त्यांची पदकाची लढत होती, त्यादिवशी त्यांचे प्रशिक्षक खाशाबांना विश्रांती करण्यास सांगून हेलसिंकी शहरात फिरण्यास गेले होते. योगायोगाने खाशाबा इतर मल्लांच्या कुस्त्या पाहण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक त्यांच्या नावाचा पुकार झाला. मग घाईघाईने खाशाबांनी संयोजकांकडे जाऊन आपल्या नावाची खात्री करून घेतली अन् तसेच आखाड्यात उतरले. एकूणच गोंधळाच्या परिस्थितीतून स्वत:ला सावरत त्यांनी 1952च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये पदकाची बाजी मारली.


पदकानंतरही सरकारने नोकरी दिली नाही
पदकानंतर सहा वर्षे ते बेकार होते. अखेर महाराष्ट्र पोलीस दलात त्यांना कशीबशी नोकरी मिळाली. अखेर निवृत्तीनंतर गावात तालीम बांधण्याचा मानस असताना, त्यांचे 1984 मध्ये अपघाती निधन झाले. जिवंतपणी त्यांना काहीच मिळाले नाही. त्यांना महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर ‘शिवछत्रपती’, तर केंद्र शासनाने ‘अर्जून’ पुरस्काराने गौरवले. दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेच्या काळात त्यांच्या स्मरणार्थ राजधानी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय कुस्ती स्टेडियमला के. डी. जाधव कुस्ती संकुल नामकरण करण्यात आले आहे. 2001 पासून त्यांच्या नावाने महाराष्ट्र शासन कुस्ती स्पर्धा भरवत आहे.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, खशाबा जाधव यांच्या कारकिर्दीतील क्षणचित्रे...

बातम्या आणखी आहेत...