आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Janhvi Kapoor And Now Avinash Tiwari Mrinal Thakur Were Selected For 'Ghost Stories' The Web Series

आधी जान्हवी कपूर आणि आता अविनाश तिवारी - मृणाल ठाकूर यांची 'घोस्ट स्टोरीज' साठी झाली निवड 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : नेटफ्लिक्सने अशातच आपल्या काही आगामी शोज आणि चित्रपटांची घोषणा केली होती. या प्रोजेक्ट्सपैकीच एक आहे 'घोस्ट स्टोरीज' ज्यामध्ये प्रेक्षकांना भुतांच्या आणि अलौकिक कथा पाहायला मिळणार आहेत. या कथा करण जोहर, जोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप दिग्दर्शित करत आहेत. अशातच जोया अख्तरने आपल्या कथेसाठी जान्हवी कपूरला निवडले आहे. तसेच आता करण जोहरनेदेखील आपल्या कथेसाठी कलाकार निवडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, करण जोहरनेदेखील आपल्या कथेसाठी अविनाश तिवारी आणि मृणाल ठाकुर यांना निवडले आहे. करण जोहर पहिल्यांदाच एखाद्या हॉरर स्टोरीमध्ये आपला हात अजमावत आहे. अविनाशने चित्रपट 'लैला मजनू' ने आपला डेब्यू केला होता तर मृणाल ठाकुरने 'लव्ह सोनिया', 'सुपर 30' आणि 'बाटला हाउस' यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. करण आपला चित्रपट 'तख्त' ची तयारी करत आहे. 

बातम्या आणखी आहेत...