आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Lady Melania Of America Will Go To A Government School In Delhi, Meet Children In Happyness Class

दिल्लीच्या शाळेतील हॅप्पीनेस क्लासमध्ये पोहोचल्या फर्स्ट लेडी मेलेनिया; मुलांनी टिळा लावून केले स्वागत, औक्षणदेखील केले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारत दौऱ्यावर आलेल्या त्यांच्या पत्नी मेलेनिया मंगळवारी दुपारी दिल्लीच्या एका शाळेत पोहोचल्या. रंगीबेरंगी वेषभूषेमध्ये असलेल्या मुलांनी अमेरिकेच्या प्रथम महिलेचे स्वागत केले. मेलेनिया यांनी सर्वोदय को-एड सीनियर सेकेंडरी शाळेत काही वेळ घालवला. त्यादरम्यान त्या शाळेतील मुलांसोबत व शिक्षकांसोबत मनमोकळेपणाने बोलताना दिसल्या. गुलाबी लेहंगा घालून स्वागत करण्यासाठी तयार असलेल्या एका मुलीसोबत तर मेलेनिया यांनी बराचवेळ बातचीत केली. सुरक्षेच्या कारणांमुळे या शाळेचे नाव अगोदर सर्वांसमोर उघड केले गेले नाही. मात्र या कार्यक्रमाबद्दल वाददेखील झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कार्यक्रमात बोलावले गेले नाही. यासाठी सुरक्षेची करणे दिली गेली आहेत.

रविवारी यूएस दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले, “आम्हाला या कार्यक्रमामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीबद्दल कोणतीही हरकत नाही. आम्ही त्यांच्या समजूतदारपनेचे कौतुक करतो कि, हा राजकीय कार्यक्रम नाही. याचा उद्देश्य शिक्षण, शाळा आणि विद्यार्थ्यांबद्दल विचार करणे आहे.”

केजरीवाल यांनी ट्वीट करून आनंद व्यक्त केला... 

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेलेनिया यांच्या शाळेच्या दौऱ्यापूर्वी ट्वीट करून आनंद व्याकर केला आहे. ते म्हणाले की, आज दिल्लीचे शिक्षक, विद्यार्थी आणि दिल्लीकरांसाठी खूप मोठा दिवस आहे. मेलेनिया आपल्या शाळांमधून हॅप्पीनेसचा संदेश घेऊन जातील.

राष्ट्रपती ट्रम्प आपल्या कुटुंबासोबत सोमवारी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर पोहोचले. अहमदाबादमध्ये पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती साबरमतीला गेले, रोड शो केला आणि 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमामध्ये दुपारी ट्रम्प आणि मेलेनिया आग्र्याला रवाना झाले आणि तिथे जाऊन ताजमहल पहिला.