आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Lieutenant General Couple : Madhuri Kanetkar Became 3rd Female Lieutenant General Of The Country

पहिले लेफ्टनंट जनरल दांपत्य : माधुरी कानेटकर देशाच्या तिसऱ्या महिला ले. जनरल बनल्या, पती राजीव आधीपासूनच आहेत रँकवर

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : सेनेमध्ये महिलांना कमांड पोस्टिंग देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर शनिवारी मेजर जनरल माधुरी कानेटकर यांना लेफ्टनंट जनरलच्या रँकसाठी प्रमोशन दिले गेले आहे. यासोबतच कानेटकर पती-पत्नी सेनेमध्ये लेफ्टनंट जनरलचा रँक मिळवणारे पहिले दाम्पत्य बनले आहेत. माधुरी यांचे पती राजीवदेखील भारतीय सेनेमध्ये लेफ्टनंट जनरल आहेत. माधुरी कानेटकर भारतीय सशस्त्र दलांमध्ये लेफ्टनंट जनरल रँकपर्यंत पोहोचणाऱ्या तिसऱ्या महिला अधिकारी आहेत. 

माधुरी बालरोगतज्ज्ञ आहेत, त्या मागील 37 वर्षांपासून सेनेमध्ये कार्यरत आहेत. मागच्यावर्षी त्यांची निवड लेफ्टनंट जनरल पदासाठी झाली होती. लेफ्टनंट जनरल कानेटकर यांनी नाची दिल्लीमध्ये चीफ ऑफ डिफेंस स्टाफअंतर्गत डेप्युटी चीफ, इंटीग्रेटेड डिफेंस स्टाफ (डीसीआयडीएस) मेडिकलचा कारभार सांभाळला. 

यापूर्वी दोन महिलांना मिळाली आहे कमांड पोस्ट... 

सशस्त्र दलांमध्ये सर्वात प्रथम नौसेनेमध्ये व्हाईस अ‍ॅडमिरल डॉ. पुनीता अरोरा यांना हे यश मिळाले होते. वायुसेनेच्या महिला एअर मार्शल पद्मावती बंदोपाध्याय या पदावर पोहोचणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत. यानंतर माधुरी कानेटकर यांना लेफ्टनंट जनरल बनवले गेले आहे. माधुरी कानेटकर एएफएमसीमध्ये टॉपर राहिल्या आहेत. त्या प्रेसिडेंशियल मेडलनेही सन्मानित केल्या गेल्या आहेत. त्या एम्समधून पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. पंतप्रधानांच्या वैज्ञानिक आणि टेक्निकल सल्लागार बोर्डच्याही सदस्य आहेत. 

बातम्या आणखी आहेत...