आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 उमेदवारांसह शिवसेनेची पहिली यादी जाहीर; पक्षांतर करून आलेले अब्दुल सत्तार, क्षीरसागर यांनाही उमेदवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारांची नावे घोषित केल्याच्या अवघ्या काही मिनिटांत शिवसेनेने देखील पहिली उमेदवारी जाहीर केली. 70 जणांच्या यादीमध्ये पक्षांतर करून शिवसेनेत आलेले अब्दुल सत्तार आणि जयदत्त क्षीरसागर यांनाही तिकीट देण्यात आले आहे. यात आदित्य ठाकरे वरळीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच नांदेड दक्षिण मधून राजश्री पाटील आणि औरंगाबाद मध्य येथून प्रदीप जैस्वाल यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
 
सुत्रांच्या माहितीनुसार, भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचा प्रश्न आता मिटला आहे. 288 पैकी 164 जागांवर भाजप आणि 124 जागांवर शिवसेना लढणार आहे. तर मित्रपक्षांना भाजप आपल्याच कोट्यातून उमेदवारी देणार अशी देखील चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 4 ऑक्टोबर पर्यंत इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यांच्या अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर रोजी आणि अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर राहील. एकाच टप्प्यात 21 तारखेला मतदान होणार आहे. तर 24 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर केले जातील.
 
 

शिवसेनेच्या पहिल्या यादीतील 70 उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे...
 
औरंगाबाद (दक्षिण) – संजय श्रीरसाठ
​​​​​​​अक्क्लकुवा – अमेशा पडवी

इगतपुरी- निर्मला गावित
​​​​​​​वसई – विजय पाटील
नालासोपारा – प्रदीप शर्मा
सांगोला – शहाजी बापू पाटील
कर्जत – महेंद्र थोरवे
घनसावंगी – हिकमत उढाण
​​​​​​​​​​​​​​खानापूर – अनिल बाबर
राजापूर – राजन साळवी
​​​​​​​बाळापूर – नितीन देशमुख
नांदेड उत्तर – राजश्री पाटील
मुरुड – महेंद्रशेठ दळवी
हडगाव – नागेश अष्टीकर
​​​​​​​मुंबादेवी – पांडुरंग सकपाळ
​​​​​​​भायखळा – यामिनी जाधव
गोवंडी – विठ्ठल लोकरे
एरंडोल/परोळा – चिमनराव पाटील
वडनेरा – प्रिती संजय
श्रीवर्धन- विनोद घोसाळकर
​​​​​​​कोपर पाचखापडी – एकनाथ शिंदे
विजापूर – रमेश बोरनावे
​​​​​​​शिरोळ – उल्हास पाटील
गंगाखेड – विशाल कदम
दापोली – योगेश कदम
गुहागार – भास्कर जाधव
अंधेरी पूर्व – रमेश लटके
कुडाळ – वैभव नाईक
ओवळा माजिवडे – प्रताप सरनाईक

बीड -जयदत्त क्षीरसागर
पैठण – संदीपान भुमरे
शहापूर – पांडुरंग बरोरा
​​​​​​​नगर शहर – अनिलभाई राठोड
सिल्लोड – अब्दुल सत्तार
 

बातम्या आणखी आहेत...