आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फर्स्ट लूक; अक्षय कुमारचा आगामी सिनेमा 'लक्ष्मी बॉम्ब'चे पहिले पोस्टर रिलीज, तृथीयपंथीयाची भूमिका साकारणार अक्षय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार त्याच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपट 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षयचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. पोस्टरमध्ये अक्षय कुमार आपल्या डोळ्यांमध्ये काजळ घालताना दिसत आहे. लूक पाहून सिनेमातील त्याच्या पात्राविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.  

 

अक्षयने शेयर केले शेअर केले पोस्टर 
सिनेमातील त्याच्या लूकचे पोस्टर स्वतः अक्षयने त्याच्या ट्विटरवरून शेयर केले आहे. पोस्टरमध्ये अक्षय डोळ्यात काजळ घालताना दिसत आहे. पोस्टर शेयर करून त्याने लिहिले, 'गोष्टीमधून तुमच्यासाठी आणला आहे खास बॉम्ब...धमाका जून 2020 मध्ये होईल.' 

 

 

अमिताभ साकारणार ट्रांसजेंडर भूताची भूमिका 
चित्रपटात अक्षयच्या अपोजिट कियारा आडवाणी दिसणार आहे. यासोबतच अमिताभ बच्चन यात ट्रांसजेंडर भुताच्या रोलमध्ये दिसणार आहे. तसेच यात तुषार कपूर आणि आर. माधवन यांच्यादेखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. 'लक्ष्मी बॉम्ब' हा तामिळ चित्रपट 'कंचना'चा रीमेक आहे. कंचनाचे दिगदर्शन राघव लॉरेंसने केले आहे आणि रिमेकदेखील तेच बनवत आहेत.  

बातम्या आणखी आहेत...