आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look : Akshay Kumar's Movie 'Bachchan Pandey' Poster Comes Out, Film Will Be Releases On Christmas Next Year

फर्स्ट लुक : अक्षयचा चित्रपट 'बच्चन पांडे' चे पोस्टर आले समोर, पुढच्या वर्षी क्रिसमसला होणार आहे रिलीज 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अक्षय कुमार चित्रपटांच्या शूटिंगमध्ये खूप व्यस्त आहे. सतत त्याच्या चित्रपटांचे पोस्टर, गाणे, टीजर आणि ट्रेलर रिलीज होत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा अपकमिंग चित्रपट 'बच्चन पांडे' चा फर्स्ट लुक शेअर केला गेला. याचे दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे आणि निर्मिती साजिद नाडियाडवाला करत आहे. अभिनेत्याने आपल्या ट्विटर हँडलवर हे पोस्टर शेअर केले आहे.  

 

 

लुंगी घालून दिसला अक्षय... 
चित्रपट पुढच्यावर्षी क्रिसमसला रिलीज होणार आहे. याची टक्कर आमिर खानच्या लाल सिंह चड्ढासोबत होणार आहे. पोस्टरबद्दल बोलायचे तर यामध्ये अक्षय साउथ इंडियन लुकमध्ये दिसणार आहे. त्याने ब्लॅक लुंगी घातली आहे. कपाळावर पांढऱ्या चंदनाचा टिळा आहे. चेहऱ्यावर घनदाट मिशा आहेत. गळ्यात जाडच जाड साखळ्या आहेत. यासोबतच त्याच्या हातात मार्शल आर्टचे मुख्य हत्यार नान चाकदेखील दिसत आहे.  

 

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी रिलीज होणार आहे 'मिशन मंगल'
चित्रपटात अक्षय बच्चन पांडेच्या रोलमध्ये असणार आहे. त्याचा लुक पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, चित्रपट अॅक्शनने भरपूर आहे. आणि अभिनेता कलाकार विशेषतः कराटे किंवा मार्शल आर्ट करताना दिसणार आहे. अक्षय लवकरच 'मिशन मंगल' या चित्रपटात दिसणार आहे. हा याच स्वान्त्र्य दिनाच्या दिवशी रिलीज होणार आहे. चित्रपटात अक्षयसोबतच विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, शरमन जोशी, कीर्ति कुल्हाडी आणि नित्या मेनन मुख्य भूमिकेत आहेत.  

 

सतत चित्रपट, शूटिंग आणि प्रमोशन आहे व्यस्त... 
अक्षय आपला चित्रपट 'मिशन मंगल' च्या प्रमोशनला सज्ज झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी जॉन इब्राहिमचा चित्रपट 'बाटला हाउस' सोबत या चित्रपटाची टक्कर होणार आहे. त्यानंतर सलग अक्षय चित्रपटात व्यस्त आहे. तो रोहित शेट्टीचा चित्रपट 'सूर्यवंशी' सोबतच 'लक्ष्मी बॉम्ब', 'हाउसफुल 4' मध्येही दिसणार आहे.

बातम्या आणखी आहेत...