आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन अब्राहमने जारी केला 'सत्यमेव जयते -2'चा फर्स्ट लुक; आता सत्य पुन्हा भारी पडणार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - जॉन अब्राहमच्या 'सत्यमेव जयतेचा' सिक्वल 'सत्यमेव जयते 2' चा फर्स्ट लुक समोर आला आहे. जॉनने सोशल मीडियावर सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले की, ''सत्य पुन्हा भारी पडेल. पुढील गांधी जयंतीला परतत आहे. सत्यमेव जयते 2'' या पोस्टरमध्ये चित्रपटाचे हिंदीत लिहिले आहे. तसेच राष्ट्रगीतातील सुरुवातीच्या 'जन गण मन' या तीन शब्दांना हाय लाइट केले आहे. पोस्टरमध्ये जॉन पोलिसाचा गणवेश फाडत छातीवरील तिरंगा दाखवत आहे. 
 

   

टी-सीरीज ने देखील जारी केले पोस्टर
 
 
 

    प्रॉडक्शन कंपनी टी-सीरीजने देखील पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री दिव्या खोसला कुमार दिसत आहे. या पोस्टरसोबत 'तन मन धन पेक्षा जन गण मन.' सादर करत आहोत 'सत्यमेव जयते - 2' चे पोस्टर. असे कॅप्शन लिहिले आहे. चित्रपट 2 ऑक्टोबर 2020 रोजी रिलीज होणार आहे. दिव्या चित्रपटाचे निर्माते आणि टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांची पत्नी आहे आणि या चित्रपटात ती जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिका करत आहे.       

हिट ठरला होता पहिला पार्ट 
 
सत्यमेव जयते -2 चे दिग्दर्शन मिलाम जावेरी करत आहेत. याअगोदर सत्यमेव जयते त्यांनी दिग्दर्शित केला होता. 15 ऑगस्ट 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचे बजेट 40 कोटी रुपये होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 89.05 कोटींचा व्यवसाय केला होता. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 20.52 कोटी रुपये कमवले होते. जॉनसह मिलापची आतापर्यंतची पहिल्या दिवशी मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला होता.  

बातम्या आणखी आहेत...