आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look Of Sanjay Dutt From Film KGF Chpter 2' Is Released Today On His 60th Birthday, Farhan Akhtar Praised The Poster

संजय दत्तने वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला चित्रपट 'KGF 2' मधील आपला फर्स्ट लुक, फरहान अख्तरनेही केले कौतुक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : संजय दत्त आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि यानिमित्ताने तेलगू चित्रपट 'केजीएफ 2' मधील फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. संजय दत्तने आपल्या इंस्टाग्रामवर 'केजीएफ चॅप्टर 2' चे पोस्टर रिलीज केले आहे, ज्यामध्ये तो 'अधीरा'च्या भूमिकेत दिसत आहे. 'केजीएफ 2' तेलगू चित्रपट आहे, ज्यामध्ये अभिनेता यश दिसणार आहे. यशने यानिमित्ताने संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संजय दत्तचा 'अधीरा' चा लुक सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

 

संजय दत्तने शेअर केले पोस्टर... 
KGF चे हे दुसरे पोस्टर खूपच जबरदस्त आहे. पोस्टरमध्ये संजय दत्तने डोक्यावर एक कपडा बांधला आहे, जो त्याने आपल्या चेहऱ्याभोवती गुंडाळला आहे. त्याचे केवळ डोळे दिसत आहेत. संजय दत्तच्या या फोटोसोबत लिहिलेले आहे, ‘SANJAY DUTT AS ADHEERA’ पोस्टर मध्ये सजंय दत्तचा लुक खूप जबरदस्त आहे. संजय दत्तने आपला लुक शेअर करून लिहिले, 'या चित्रपटाचा भाग बनून खूप खुश आहे.' 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

फरहान अख्तरनेही केले संजयचे कौतुक...  
फरहान अख्तर म्हणाला, 'मला आठवते, मी लहान असताना मी बॅण्डस्टॅण्डवर त्यांना त्यांचा डेब्यू चित्रपट 'रॉकी' चे शूटिंग करताना पहिले होते... आणि एवढ्या वर्षानंतर पुन्हा एकदा काहीतरी स्पेशल घेऊन येत आहे. सादर आहे... संजय दत्त 'अधीरा' च्या भूमिकेत.... आणि सोबतच वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..' 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मान्यताने शेयर केला केकचा फोटो... 
लुक रिलीज होण्याबरोबरच संजय आपला बर्थ-डे आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करत आहे. 28 जुलैच्या रात्री तो पत्नी मान्यता आणि मुले शाहरान आणि इकरासोबत बर्थ-डे डिनर एन्जॉय करताना दिसला. यादरम्यान संजयची बहीण प्रिया दत्त आणि इतर फॅमिली मेम्बर्सदेखील दिसले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...