आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look Of The Film 'The Sky Is Pink' Is Released, Movies Premier Will Be At Toronto International Film Festival

'द स्काय इज पिंक' चा पहिला फोटो आला समोर, टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये होणार आहे प्रदर्शित 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्रा जोनसचा अपकमिंग चित्रपट 'द स्काय इज पिंक' चा फर्स्ट लुक समोर आला आहे. फिल्म मेकर शोनाली बोसने पहिला फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच तिने सांगितले की, चित्रपटाचे प्रीमियर टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 13 सप्टेंबरला होईल. प्रियांका खूप दिवसानंतर पुन्हा बॉलिवूडचा भाग बनणार आहे. ती या चित्रपटाशी निर्माती म्हणूनही जोडली गेली आहे.  

 

13 सप्टेंबरला होईल प्रीमियर... 
फर्स्ट लुकमध्ये चार लोकांच्या हसत्या खेळत्या कुटुंबाचा फोटो दिसत आहे. शोनालीने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, 'हे सांगताना खूप आनंद होत आहे की, 'द स्काय पिंक' चा टोरंटो इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल (टीआईएफएफ) मध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या फेस्टिवलमध्ये जाणारा हा यावेळचा एशियातील एकुलता एक चित्रपट आहे. वर्ल्ड प्रीमियर - 13 सप्टेंबरला होईल.' 

 

शोनालीची इंस्टा पोस्ट... 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Thrilled to announce that The Sky is Pink will have it’s world premier at TIFF as one of 20 Gala presentations- the only Asian film this year in the Galas. The BEST most special and miraculous part is that this - the World premier - will take place on September 13, Ishan’s deathday. It’s a clear sign from him that he’s fully with his Mum and has blessed this film right from the start. In fact it was last year on his birthday that the making of the film started as on that day I woke up in LA to a message that PC loved the script and wanted to meet me. With Ishan and Aisha (Chaudhary) above and a fantastic cast and crew below - we turned the sky pink. 😃

A post shared by Shonali Bose (@shonalibose_) on

 

आईच्या भूमिकेत दिसणार आहे प्रियांका... 
तसेच प्रियांकाने न्यूज एजन्सीला सांगितले की, 'मला खूप अभिमान वाटत आहे की, हा चित्रपट यावर्षी टीआईएफएफमध्ये प्रदर्शित होईल. दोन वर्षांपूर्वी माझी प्रोडक्शन कंपनी पर्पल पेबेल्सचा चित्रपट 'पहूना : द लिटिल विजिटर्स' देखील याच फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित झाला होता. हा एक उत्तम चित्रपट आहे, कथा ऐकताच मी याच्याशी जोडले गेले होते. मी चित्रपटात आयेशा चौधरीची आई अदिती चौधरीची भूमिका साकारत आहे. एक कलाकार म्हणून टीनएज मुलांच्या आईची भूमिका साकारणे कठीण आहे.'

 

काय आहे चित्रपटाची कहाणी... 
चित्रपटाची कहाणी एका कपलच्या अवती भोवती फिरते. अदिती आणि नरेन चौधरी आपली मुलगी आयेशा चौधरी जिला एक गंभीर आजार आहे. चित्रपटात मुलीचा आजार आणि माता-पिताचा संघर्ष दाखवला जाणार आहे. प्रियांकासोबत चित्रपटात फरहान अख्तर, जायरा वसीम आणि रोहित सराफ मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपट मोटिवेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या आयुष्यावर आधारित आहे. सहा महिन्यांच्या वयात बोन मॅरो ट्रांसप्लांटचा सामना करणाऱ्या आयेशाला काही काळानंतर साइड-इफेक्टमुळे पल्मोनरी फायबरोसिस सारखा घातक आजार झाला होता. केवळ 19 वर्षांच्या वयात तिचा मृत्यु झाला होता.