आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे आहे देशभरात खळबळ उडवून दिलेले रफाल विमान, फ्रान्समध्ये घेण्यात आली चाचणी, पाहा Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - भारतीय हवाई दलासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या रफाल विमानांच्या सौद्यावरून सध्या भारतीय राजकारणात भूकंप आलेला आहे. विरोधक सातत्याने या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत आहेत. केंद्र सरकारने या विमानांच्या सौद्याबाबत सुप्रीम कोर्टात माहितीही सादर केली आहे. पण भारताला मिळणारे विमान नेमके कसे असेल याचे फोटो आणि व्हिडिओ नुकतेच समोर आले आहेत. 


भारतीय हवाईदलासाठी तयार करण्यात आलेल्या रफाल विमानांना फ्रान्सच्या इस्त्रे ले ट्यूब नावाच्या एअरबेसवर चाचणी घेण्यात आली. यावेळी हे विमान नेमके कसे असणार हे समोर आले आहे. चला तर मग पाहुयात कसे आहे हे विमान. 

पाहा विमानाच्या चाचणीचा Video 

#Visuals: First look of the #Rafale jet for the Indian Air Force, from the Istre-Le Tube airbase in France pic.twitter.com/Qv4aJdgjI7

— ANI (@ANI) November 13, 2018

 

 

बातम्या आणखी आहेत...