• Home
  • Gossip
  • First Look : Salman Khan shares 'Dabangg 3' motion poster, saying 'Do Welcome us'

Bollywood / फर्स्ट लुक : सलमान खानने शेअर केले 'दबंग 3' चे मोशन पोस्टर, म्हणाला - 'स्वागत तरी करा आमचे'

चार भाषांमध्ये रिलीज होईल चित्रपट

दिव्य मराठी वेब

Sep 11,2019 01:17:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : सलमान खानचा आगामी चित्रपट 'दबंग 3' चा फर्स्ट लुक बुधवारी रिलीज झाला. सलमान खानने ट्विटरवर चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले आहे, "आ रहे हैं चुलबुल रॉबिनहुड पांडे ठीक 100 दिन बाद। स्वागत तो करो हमारा।" मोशन पोस्टरमधेही सलमान हाच डायलॉग बोलताना दिसत आहे.


चार भाषांमध्ये रिलीज होईल चित्रपट...
चित्रपट हिंदीसोबतच आणखी तीन भाषांमध्ये तमिळ, तेलगु आणि कन्नड यामध्येदेखील रिलीज होणार आहे. सलमानने या तिन्ही भाषांमध्येही मोशन पोस्टर शेअर केले आहे. 'दबंग' फ्रॅन्चायसीचा हा तिसरा चित्रपट आहे, ज्याचे दिग्दर्शन प्रभुदेवाने केले आहे. यापूर्वी प्रभुदेवाने सलमानचा चित्रपट 'वॉन्टेड' (2009) मध्ये दिग्दर्शित केला होता.


चित्रपटात यांच्याही आहेत महत्वाच्या भूमिका...
20 डिसेंबरला रिलीज होणार चित्रपट 'दबंग 3' चा प्रोड्यूसर सलमान खान, अरबाज खान आणि निखिल द्विवेदी आहे. चित्रपटात सुदीप, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रमोद खन्ना, टीनू आनंद, पंकज त्रिपाठी आणि नवाब शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

X
COMMENT