आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • First Look| Sanjay Leela Bhansali To Launch First Look Of Man Bairagi On Narendra Modi's Birthday

भंसाळीच्या 'मन बैरागी'चे पहिले पोस्टर रिलीज; चित्रपटात दिसणार मोदींच्या किशोरवयातील कथा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क - बॉलीवूडमध्ये पंतप्रधान मोदींवरील बायोपिक किंवा त्यांच्या आयुष्याशी प्रेरित गोष्टींवर चित्रपट आणि वेब शोजची निर्मिती सुरुच आहे. यावर्षी विवेक ओबेरॉय पीएम मोदींवर बायोपिक घेऊन आला होता. आता चित्रपट निर्माता दिग्दर्शक संजय लीली भंसाळी आणि महावीर जैन यांनी मोदींच्या आयुष्यावर 'मन बैरागी' नावाची एक खास फिचर फिल्म तयार करण्यात आली आहे. या फिल्मचा फर्स्ट लुक मंगळवारी पीएम मोदींच्या वाढदिवशी जारी करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय त्रिपाठी यांनी केले आहे.  
 

अक्षय कुमारने शेअर केला फर्स्ट लुक
अक्षय कुमारने ट्विटरवर चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर करत लिहिले की 'आपले पंतप्रधानांच्या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील परिभाषित क्षणांवर आधारित संजय लीली भंसाळी आणि महावीर जैन यांची स्पेशल फीचर 'मन बैरागी'चा फर्स्ट लुक सादर करताना आनंद होत आहे.'
 

           

चित्रपटाविषयीची थोडक्यात माहिती, जी तुम्हाला जाणून घ्यायची आहे 
 
 
 
 
 
 
 

> अशी असेल कथा
दैनिक भास्करने या चित्रपटाशी निगडीत असलेल्या सुत्रांकडून चित्रपटाविषयी माहिती प्राप्त केली आहे. यामध्ये मोदींचे संपूर्ण आयुष्य न दाखवता त्यांच्या किशोवयातील अद्भुत संघर्षाचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. वयाच्या 13 ते 20 वर्षांपर्यंत त्यांच्या जीवनातील कथा यात पहावयास मिळतील.
 
 
 

> कोण होणार मोदी?
या चित्रपटात युवा आणि नवोदित अभिनेता अभय वर्माने पंतप्रधान मोदींची भूमिका पार पाडली आहे. 
 
 
 
 
 
 
 
> या चित्रपटात पंतप्रधानांच्या राजकीय जीवनातील कोणताही भाग दाखवण्यात येणार नाही. या तरुण वयात मोदींनी कोणत्या कारणास्तव स्वत: चा शोध घेण्यास सुरूवात केली, केवळ त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. 
 
 
 
 
 
 
 

> कथेसाठी केले असे प्रयत्न
या चित्रपटासाठी मोदींवर लिहिलेली पुस्तके, त्यांच्या मुलाखती, त्यांना लहानपणापासून ओळखत असलेल्यांसोबत चर्चा करून तयारी करण्यात आली.
 
 
 

> केव्हापासून सुरु आहे शुटिंग
यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले होते. मंगळवारी लॉन्च झालेल्या पोस्टरच्या मते, हा चित्रपट यावर्षी हिवाळ्यात प्रदर्शित होईल.