political / ७१ वर्षांत महाराष्ट्रातून प्रथमच बिगर काँग्रेसी मुस्लिम खासदार; इम्तियाज जलील यांनी रचला इतिहास

१५ वर्षांत प्रथमच राज्यातून मुस्लिम खासदार लोकसभेत
 

दिव्य मराठी

May 25,2019 09:59:00 AM IST

औरंगाबाद - महाराष्ट्रात ७१ वर्षांत प्रथमच बिगर काँग्रेसी मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचला. औरंगाबादेत एमआयएम उमेदवार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांना पराभूत करून हा इतिहास घडवला. आजवर महाराष्ट्रातून ११ मुस्लिम खासदार लाेकसभेत गेले आहेत. मात्र ते सर्व काँग्रेस पक्षाच्या तिकिटांवरच विजयी झाले होते.

इम्तियाज जलील यांनी रचला इतिहास
> १९६२ मध्ये अकोल्यातून काँग्रेसच्या तिकिटावर मोहंमद मोहिब्बुल हक विजयी झाले होते. येथून १९६७ व १९७१ मध्ये मुस्लिम खासदार झाले.


> १९८४ मध्ये वाशीम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री नेते गुलाम नबी आझाद यांनी विजय मिळवला होता.


> बॅरिस्टर ए.आर. अंतुले हे महाराष्ट्रातून वेळेस खासदार झालेले शेवटचे नेते होते. २००४ मध्ये ते कोलाबा मतदारसंघातून जिंकले होते. या नंतर ते मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक विभागाचे मंत्री बनले होते.

X