• Home
  • Sports
  • Cricket
  • First of all, the question of the plains of the allied districts of Zhen will be resolved soon Reaction of newly appointed MCA President Vikas Kakatkar

दिव्य मराठी विशेष / सर्वप्रथम झाेनमधील संलग्न जिल्ह्यातील मैदानांचा बिकट प्रश्न लवकरच मार्गी लावणार - एमसीएचे नवनियुक्त अध्यक्ष विकास काकतकर यांची प्रतिक्रिया

आता महिन्याची बैठक प्रत्येक जिल्ह्यात हाेणार
 

दिव्य मराठी

Oct 03,2019 09:55:00 AM IST

एकनाथ पाठक

औरंगाबाद - महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनशी संलग्न असलेल्या पाच झाेनमधील सर्वच जिल्ह्यांतील क्रिकेट मैदानांचा प्रश्न अतिशय बिकट आहे. गत दीड वर्षापासून याकडे काेणत्याही प्रकारचे लक्ष दिले गेले नाही. मात्र, सर्वप्रथम या पाचही झाेनमधील मैदानांचा सर्वात माेठा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. या माेहिमेला लवकरच सुरुवात हाेईल, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनचे नवनियुक्त अध्यक्ष विकास काकतकर यांनी ‘दिव्य मराठी’ बाेलताना दिली. त्यांची बुधवारी एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविराेध निवड करण्यात आली. याशिवाय माजी क्रिकेटपटूंना एकत्र आणणे आणि त्यांच्या माध्यमातून युवांना खास प्रशिक्षण देण्याची याेजनाही तयार आहे. याचा निश्चित युवांना माेठा फायदा हाेणार आहे, असेही ते म्हणाले.

माजी खजिनदार विकास काकतकर यांच्याकडे महाराष्ट्र क्रिकेट असाेसिएशनच्या नेतृत्वाची धुरा साेपवण्यात आली आहे. त्यांची बुधवारी एमसीएच्या अध्यक्षपदी बिनविराेध निवड झाली. अॅपेक्स काैन्सिलच्या बैठकीमध्ये ही घाेषणा करण्यात आली. यादरम्यान एमसीएच्या उपा‌ध्यक्षपदी अजय गुप्ते, सचिवपदी रियाझ बागवान यांची बिनविराेध निवड झाली.

आता महिन्याची बैठक प्रत्येक जिल्ह्यात हाेणार

पाच झाेनमधील संलग्न जिल्ह्यांच्या विकासासाठी मी वेगळी माेहीम संघटनेच्या वतीने राबवणार आहे. यासाठी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची प्रत्येक महिन्याची बैठक ही प्रत्येक जिल्ह्यात आयाेजित करण्यात येईल. या बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्यांच्या अडीअडचणींचा आम्हाला जवळून पाहता येईल. येथील असुविधा आणि अडचणी दूर करण्यासाठी मदत हाेईल. माझ्या या प्रस्तावाला सर्वच सदस्यांनी एकमताने संमती दर्शवली आहे. या बैठकीमुळे प्रश्न साेडवण्यासाठी पुढाकार घेता येईल. तसेच विकासकामाचा आढावाही घेता येणार आहे, अशी प्रतिक्रिया काकतकर यांनी दिली.

X