आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहे भारतमातेचे पहिले चित्र आहे. अहमदाबादेतील शिक्षक मगनलाल शर्मा यांनी १९०६ मध्ये हे चित्र साकारत नाव हिंद देवी असे ठेवले. स्वातंत्र्य लढ्यादरम्यान पहिल्यांदा या चित्राच्या माध्यमातून अखंड भारताची प्रतिमा लोकांसमोर ठेवण्यात आली. या चित्रात भारतमातेच्या डोक्यावरील मुकुट काश्मीर, तर पाय दक्षिणेमध्ये श्रीलंकेपर्यंत दाखवले आहेत.
लंका म्हणजे देवीच्या पायावर चढवलेले फूल. उजव्या हातातील त्रिशूळ सिंध ते अफगाणपर्यंत आहे, तर साडी पूर्वेकडे बंगालपर्यंत आहे. केस हिमालयाच्या शिखरासह पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत आहेत. तेव्हा या चित्राच्या हजारो प्रती राजा रवी वर्मा यांच्या जर्मनीस्थित प्रेसमध्ये छापण्यात आल्या. गावोगाव याची चर्चा झाली. रवींद्रनाथ टागोर यांनी हिंद देवीपासून प्रेरणा घेत १९३० मध्ये प्रसिद्ध गीत ‘अयि भूवनमनो मोहिनी’ लिहिल्याचे म्हटले जाते. तर हे चित्र स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा असल्याचे अरबिंद घोष यांनी म्हटले हाेते. गुजरातचे संत स्वामी आनंद यांनी त्यांच्या ‘संतोना अनुज’मध्ये याचा उल्लेख केला होता.
पुढील स्लाइडवर पाहा, भारतमातेचे संपूर्ण चित्र आणि जाणून घ्या, भारतमातेच्या पहिल्या मंदिराविषयी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.