आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

France: बंद पडले पॅरिसचे पहिले न्यूड Resturant; ग्राहकांनीच दिली ही कारणे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - फ्रान्सच्या राजधानी गतवर्षीच उघडलेले देशातील पहिले न्यूड रेस्तरॉ आता बंद पडले आहे. या ठिकाणी येणाऱ्या कुठल्याही ग्राहकाला कपडे (अंतर्वस्त्र सुद्धा) घालण्याची परवानगी नव्हती. कपडे घातलेल्यांना यात प्रवेश दिला जात नव्हता. सोबतच, फक्त फोन किंवा ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांनाच येथे जागा दिली जात होती. परंतु, कालांतराने या ठिकाणी ग्राहकांची संख्या कमी झाली. गेल्या काही महिन्यांपासून या रेस्तरॉमध्ये कुणीच येत नव्हते. अखेर रिकाम्या खुर्च्या पाहून मालकाने आपले 'दुकान' बंद करण्याचा निर्णय घेतला.


पॅरिसमध्ये गेल्या वर्षी उघडलेल्या या रेस्तरॉचे नाव O' Natural असे होते. आहे. माइक आणि स्टेफनी यांनी त्याची सुरुवात केली. हा बिझनेस फ्रान्समध्ये मोकळेपणाला प्रोत्साहित करेल अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु, त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळाला नाही. फ्रान्सच्या द लोकल या ऑनलाइन दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, टीकाकारच नव्हे, तर लोकांना सुद्धा ही संकल्पना आवडली नाही. दैनिकाशी संवाद साधताना एका महिलेने सांगितले, की बीचवर न्युडिटी सामान्य बाब आहे. त्या ठिकाणी लोकांना कपडे नाही घातल्याबद्दल काहीच वाटत नाही. परंतु, एखाद्या रेस्तरॉमध्ये सगळेच कपडे काढून अनोळखी लोकांसमोर खात बसणे हे खटकणारे आहे. तर काहींनी या हॉटेलच्या अटी-शर्तींना दोष दिला.


प्रवेश करण्यापूर्वीच दिली जायची अशी वॉर्निंग...
- लोकांना या रेस्तरॉमध्ये येण्यापूर्वी रितशीर रिझर्वेशन करावे लागते. ग्राहकांना प्रवेश देण्यापूर्वीच लोकांना एक वॉर्निंग दिली जाते, की हे एक जेवण्याचे ठिकाण आहे. येथे अश्लीलता चालणार नाही.
- रेस्तरॉमध्ये प्रवेश घेताच त्यांना थेट रेस्टरूममध्ये पाठवले जाते. तेथे ग्राहकांना आपले सर्व कपडे काढून ठेवावे लागतात. ग्राहकांना येथे अंडरगार्मेंट सुद्धा घालण्याची परवानगी नाही.
- प्रत्येक ग्राहकाला कागदाच्या चपला दिल्या जातात. परंतु, स्थानिकांना ही संकल्पना पटली नाही.

बातम्या आणखी आहेत...