आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JNU विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ला करणाऱ्याचा पहिला Photo; पोलिस म्हणाले, गोळी झाडलीच नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली -  जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी (जेएनयू) चा विद्यार्थी नेता उमर खालिदवर हल्ला करणाऱ्या संशयिताचा फोटो मंगळवारी जारी करण्यात आला आहे. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीवी फुटेजमध्ये संशयित विठ्ठलभाई मार्गावर पळताना दिसून आला आहे. उमर खालिदवर सोमवारी दुपारी संसद परिसरात हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. खालिदला लक्ष्य करून एक गोळी झाडण्यात आली असे सांगण्यात आले. परंतु, पोलिसांनी घटनास्थळावरून बंदूक जप्त केली तरी त्यातून गोळी झाडण्यात आलेली नाही असे स्पष्ट केले. पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार, त्या बंदूकीत सर्व काडतूस भरलेल्याच होत्या.


प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितल्याप्रमाणे, उमर आमच्यासोबत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये 'खौफ से आझादी' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता. ज्यावेळी आम्ही एका स्टॉलवर चहा घेत होतो, त्याचवेळी पांढरे शर्ट घातलेली एक व्यक्ती आली. त्याने आम्हाला धक्का दिला आणि फायरिंग केली. धक्का दिल्याने खालिद खाली पडला आणि गोळी त्याच्या बाजूने निघून गेली. आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण, तो वेळीच घटनास्थळावरून पसार झाला. 

 

They can't scare us into silence, a lesson I learnt from Gauri Lankesh!

(Detailed response in the morning). pic.twitter.com/MJbtPK5El4

— Umar Khalid (@UmarKhalidJNU) 13 August 2018

चेहरा पाहू शकलो नाही -खालिद
या घटनेनंतर खालिदने म्हटले, की "आम्ही ज्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलो होतो ते सुरू होण्यासाठी थोडासाच वेळ उरला होता. एका स्टॉलवर चहा घेतल्यानंतर आम्ही आत जाण्याच्या घाईत होतो. त्याचवेळी मागून आलेल्या हल्लेखोराने मला धक्का दिला आणि एक गोळी फायर केली. मी हल्लेखोराचा चेहरा पाहू शकलो नाही. या घटनेवरून स्पष्ट झाले की असे वातावरण तयार केले जात आहे ज्यात काहीही होऊ शकते. अशा भीतीच्या वातावरणात लोक किती दिवस जगतील."

बातम्या आणखी आहेत...